NIA मध्ये नोकरीची संधी, 2 लाखांपेक्षा जास्त सॅलरी, मुलाखतीद्वारे होईल निवड!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 04:14 PM2022-11-29T16:14:18+5:302022-11-29T16:14:49+5:30
NIA ASP Vacancy 2022 : रतीसाठी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 11 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये तुम्ही ऑफलाइन अर्ज करू शकता.
नवी दिल्ली : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. नॅशनल सिक्युरिटी एजन्सीमध्ये (Natioal Investigation Agency) अतिरिक्त पोलीस अधीक्षक (Additional Superintendent Police)पदांसाठी भरती जारी करण्यात आली आहे. भरतीसाठी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 11 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये तुम्ही ऑफलाइन अर्ज करू शकता.
अर्जाचा फॉर्म NIA च्या nia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी वेबसाइटवर जाऊन अधिसूचना तपासा. नॅशनल सिक्युरिटी एजन्सीकडून या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया 10 नोव्हेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या रिक्त पदासाठी अर्ज कसा करायचा ते तुम्ही खाली पाहू शकता.
असा करू शकता अर्ज
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी पहिल्यांदा NIA च्या अधिकृत वेबसाइटला भेट दिली पाहिजे. वेबसाइटच्या होम पेजवर RECRUITMENT चा ऑप्शन दिसेल. यानंतर NIA ASP Recruitment च्या लिंकवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर अर्ज डाउनलोड करावा लागेल. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढावी लागेल. यानंतर अर्ज करण्यासाठी अर्जाची हार्ड कॉपी सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली 110003 येथे पाठवावी लागेल. संदर्भात अधिक माहितीसाठी अधिसूचना पाहा.
या पदांसाठी उमेदवाराची पात्रता
नॅशनल सिक्युरिटी एजन्सीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदासाठी अर्ज करणार्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. यामध्ये 10 वर्षांची पात्रता असणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी अधिसूचना पाहा. तसेच, गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासाची प्रकरणे हाताळण्याचा किंवा दहशतवादविरोधी ऑपरेशन किंवा काउंटर टेररिझममध्ये प्रशिक्षण देण्यासह गुप्तचर कामाचा 3 वर्षांचा अनुभव असला पाहिजे.
निवड प्रक्रिया
नॅशनल सिक्युरिटी एजन्सीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या रिक्त पदासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 67,700 रुपये ते 2,08,700 रुपये पगार मिळण्याची शक्यता आहे.