NTA कडून UGC NET च्या डिसेंबर-जूनच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, पाहा परीक्षेचा पॅटर्न अन् करियरच्या संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2022 02:18 PM2022-06-28T14:18:22+5:302022-06-28T14:25:45+5:30
डिसेंबर २०२१ आणि जून २०२२ च्या एकत्रित UGC NET परीक्षेच्या तारखा NTA ने जाहीर केल्या आहेत. या परीक्षा ८ जुलैपासून ते १४ ऑगस्ट २०२२ पर्यंत असतील.
डिसेंबर २०२१ आणि जून २०२२ च्या एकत्रित UGC NET परीक्षेच्या तारखा NTA ने जाहीर केल्या आहेत. या परीक्षा ८ जुलैपासून ते १४ ऑगस्ट २०२२ पर्यंत असतील. या परीक्षांचे विस्तृत वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. UGC NET परीक्षा २०२२ ही जुलै महिन्यातील ८, ९, ११, १२ तर ऑगस्ट महिन्यातील १२, १३ आणि १४ या तारखांना दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे.
UGC NET दोन शिफ्टची वेळ-
- शिफ्ट १ - पेपर १ - सकाळी ९ ते दुपारी १२
- शिफ्ट २ - पेपर २ - दुपारी ३ ते सायंकाळी ६
कोरोना विषाणूच्या हाहा:कारामुळे UGC NET च्या डिसेंबर २०२१ मधील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र पुढील परीक्षा व्यवस्थेवर परिणाम होऊ नेय आणि पुढील प्रक्रियेत विलंब होऊ नये यासाठी डिसेंबर २०२१ आणि जून २०२२ या दोन परिक्षांच्या प्रक्रिया विलीन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. UGC NET प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात त्यासंबंधीची तारीख जाहीर होणे अपेक्षित आहे. ntanet.nic.in/ या अधिकृत वेबसाइटवर याबाबतची माहिती उपलब्ध असेल.
परीक्षा केंद्र आणि शिफ्टची वेळ याची माहिती प्रवेशपत्रावर देण्यात येईल. परीक्षार्थ्यांना मिळालेल्या परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र आणि एक फोटो असलेले ओळखपत्र घेऊन वेळेत पोहोचावे लागेल.
परीक्षा कशी असेल (पॅटर्न)
- परीक्षेची पद्धत: ऑनलाइन
- पेपर्सची संख्या: २ (स्वाभाविक कल आणि निवडलेला विषय)
- प्रश्नांची संख्या: ५०+१००
- प्रश्नांचा प्रकार: एकाधिक निवड प्रश्न (Multiple Choice Questions)
- कमाल गुण: १००+२००
- निगेटिव्ह मार्किंग: नाही
- परीक्षेचा कालावधी : ३ तास
महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी उमेदवारांची पात्रता तपासण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (NAT) UGC NET परीक्षा घेतली जाते. सुमारे १०० विषयांसाठी ही परीक्षा घेतली जाते. उमेदवारांना त्यापैकी कोणत्याही एकाची निवड करायची असते.
UGC NET विषयांची यादी
- अर्थशास्त्र / ग्रामीण अर्थशास्त्र / सहकार / लोकसंख्या / विकास नियोजन / विकास अभ्यास / अर्थमिति / उपयोजित अर्थशास्त्र / विकास पर्यावरण / व्यवसाय अर्थशास्त्र
- राज्यशास्त्र
- तत्वज्ञान
- मानसशास्त्र
- समाजशास्त्र
- इतिहास
- मानववंशशास्त्र
- वाणिज्य
- शिक्षण
- सामाजिक कार्य
- संरक्षण आणि धोरणात्मक अभ्यास
- गृहशास्त्र
- सार्वजनिक प्रशासन
- लोकसंख्या अभ्यास
- संगीत
- व्यवस्थापन ( त्यासह व्यवसाय प्रशासन व्यवस्थापन / विपणन / विपणन व्यवस्थापन / औद्योगिक संबंध आणि कर्मचारी व्यवस्थापन / कर्मचारी व्यवस्थापन / आर्थिक व्यवस्थापन / सहकारी व्यवस्थापन)
- मैथिली
- बंगाली
- हिंदी
- कन्नड
- मल्याळम
- ओरिया
- पंजाबी
- संस्कृत
- तमिळ
- तेलुगू
- उर्दू
- अरेबिक
- इंग्रजी
- भाषाशास्त्र
- चिनी
- डोग्री
- नेपाळी
- मणिपूरी
- आसामी
- गुजराती
- मराठी
- फ्रेंच (फ्रेंच व्हर्जनप्रमाणे)
- फ्रेंच (इंग्रजी व्हर्जनप्रमाणे)
- स्पॅनिश
- रशियन
- पर्शियन
- राजस्थानी
- जर्मन
- जपानी
- प्रौढ शिक्षण / सातत्यपूर्ण शिक्षण / अँड्रागोजी / अनौपचारिक शिक्षण.
- शारीरिक शिक्षण
- अरब संस्कृती आणि इस्लामिक अभ्यास
- भारतीय संस्कृती
- कामगार कल्याण / कर्मचारी व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / कामगार आणि समाज कल्याण / मानव संसाधन व्यवस्थापन
- कायदा (विधी अभ्यास)
- ग्रंथालय आणि माहिती विज्ञान
- बौद्ध, जैन, गांधीवादी आणि शांतता अभ्यास
- धर्मांचा तुलनात्मक अभ्यास
- जनसंवाद आणि पत्रकारिता
- परफॉर्मिंग आर्ट - नृत्य / नाटक / नाट्य
- संग्रहालय आणि संवर्धन
- पुरातत्व
- क्रिमिनोलॉजी
- आदिवासी आणि प्रादेशिक भाषा / साहित्य
- लोकसाहित्य
- तुलनात्मक साहित्य
- संस्कृत पारंपारिक विषय (त्यासह ज्योतिष / सिद्धांत ज्योतिष / नव्य व्यकर्ण / व्याकर्ण/ मीमांसा / नव्य न्याय / सांख्य योग / तुलनात्मक दर्शन / शुक्ल यजुर्वेद / माधव वेदांत / धर्मसत्ता / साहित्य / पुराणोतिहास / आगम)
- महिला अभ्यास
- व्हिज्युअल आर्ट (रेखांकन आणि चित्रकला / शिल्पकला / अप्लाईड आर्ट / कलेचा इतिहास यासह)
- भूगोल
- सामाजिक औषध आणि समुदाय आरोग्य
- फॉरेन्सिक सायन्स
- पाली
- काश्मिरी
- कोंकणी
- संगणक विज्ञान आणि अनुप्रयोग
- इलेक्ट्रॉनिक सायन्स
- पर्यावरण विज्ञान
- राजकारण - आंतरराष्ट्रीय संबंध / आंतरराष्ट्रीय अभ्यास त्यासह संरक्षण / स्ट्रॅटेजिक स्टडीज, वेस्ट एशियन स्टडीज, साउथ ईस्ट एशियन स्टडीज, आफ्रिकन स्टडीज, साउथ एशियन स्टडीज, सोव्हिएत स्टडीज, अमेरिकन स्टडीज
- प्राकृत
- मानवी हक्क आणि कर्तव्ये
- पर्यटन प्रशासन आणि व्यवस्थापन.
- बोडो
- योग
- सिंधी
UGC NET परीक्षेनंतर करियरच्या संधी
उमेदवार UGC NET परीक्षेद्वारे ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) आणि असिस्टंट प्रोफेसर लेक्चरशिप यापैकी एक निवडू शकतात. JRF ची निवड करणारे ज्युनियर रिसर्च फेलो, प्रोजेक्ट फेलो, प्रोजेक्ट असिस्टंट / असोसिएट, लेखक आणि प्रोजेक्ट मॅनेजर या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी प्रारंभिक वेतन सुमारे ३० हजार रूपये आहे.
लेक्चरशिप निवडणारे भारतातील कोणत्याही महाविद्यालय / विद्यापीठात कनिष्ठ सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज करू शकतात. त्यांच्या कामांमध्ये अंडरग्रेजुएट्सना शिकवणे, व्यावसायिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देणे, पोस्ट-डॉक्टरेट फेलोना प्रशिक्षण देणे आणि विद्यार्थ्यांसाठी शंका-निवारण सत्र आयोजित करणे यांसारख्या भूमिका असतील. त्यांच्या करिअरच्या वाढीमध्ये आणि पदोन्नतीच्या मार्गांमध्ये संबंधित क्रमाने खालील पदांचा समावेश असेल.
UGC NET कनिष्ठ सहाय्यक प्राध्यापक पदोन्नती
- सहाय्यक प्राध्यापक (असिस्टंट प्रोफेसर)
- वरिष्ठ सहाय्यक प्राध्यापक Senior Assistant Professor
- सहाय्यक प्राध्यापक (निवड श्रेणी)
- सहयोगी प्राध्यापक (असोसिएट प्राध्यापक)
- प्राध्यापक
- जनरल हेड
UGC NET कनिष्ठ सहाय्यक प्राध्यापकांचे मूळ वेतन महाविद्यालय / विद्यापीठ आणि उमेदवारांच्या कौशल्यांवर अवलंबून असून ते २५ हजारांपासून ते ५० हजारांपर्यंत असू शकते. डॉक्टरेट पदवी असलेल्यांना नमूद केलेल्या वेतनापेक्षाही जास्त वेतन मिळू शकते. पात्रता निकष पूर्ण केल्यास आणि संबंधित कौशल्ये असल्यास उमेदवार सहाय्यक प्राध्यापक आणि प्राध्यापकांच्या पदांसाठी देखील अर्ज करू शकतात. अशा प्रकरणांमध्ये मूळ वेतन कनिष्ठ सहाय्यक प्राध्यापकांपेक्षा जास्त असेल परंतु विद्यापीठे / महाविद्यालयांच्या आधारावर ते वेगवेगळे असेल.
संशोधन आणि लेक्चरशिप व्यतिरिक्त, UGC NET पात्रताधारक अनेक भूमिकांसाठी अर्ज करू शकतात. यात प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह, कन्सल्टंट, ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह, लेखक, लॅब ट्रेनर, सेंटर मॅनेजर, आयपी लीड, गेस्ट फॅकल्टी इत्यादींचा समावेश आहे. तसेच UGC NET पात्र उमेदवारांना IOCL, BHEL, ONG, BEL, OIL, NTPC आणि यांसारख्या इतर अनेक PSU (पब्लिक सेक्टर अंडटेकिंग्ज) नोकरीच्या संधी देतात.