NTPC Recruitment 2022 : एनटीपीसीमध्ये इंजिनीअर्स आणि इतर पदांसाठी रिक्त जागा, अधिसूचना लवकरच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 06:28 PM2022-07-13T18:28:25+5:302022-07-13T18:29:00+5:30
NTPC Recruitment 2022 : एनटीपीसी भरती 2022 अंतर्गत एकूण 60 पदे भरली जाणार आहेत, ज्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेस, फायनान्स, अकाउंट्स, आयटी आणि इतर पदांचा समावेश आहे.
नवी दिल्ली : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने (National Thermal Power Corporation Limited) रिन्यूएबल एनर्जी (Renewable Energy) संबंधित पदांच्या भरतीसाठी एक छोटी अधिसूचना जारी केली आहे.
या अधिसूचनेनुसार, उमेदवार एनटीपीसीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे 15 जुलै ते 29 जुलै 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतील. एनटीपीसी भरती 2022 अंतर्गत एकूण 60 पदे भरली जाणार आहेत, ज्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेस, फायनान्स, अकाउंट्स, आयटी आणि इतर पदांचा समावेश आहे. याची सविस्तर सूचना अधिकृत वेबसाइट careers.ntpc.co.in वर लवकरच अपलोड केली जाईल.
महत्त्वाच्या तारखा...
सविस्तर अधिसूचना - लवकरच प्रसिद्ध केली जाईल
अर्ज सादर करण्याची सुरुवातीची तारीख- 15 जुलै 2022
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख - 29 जुलै 2022
या पदांसाठी भरती
या भरती प्रक्रियेद्वारे रिन्यूएबल एनर्जी संबंधित 45 पदे, एचआरची 01 पदे, कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेसची 04 पदे, फायनान्सची 02 पदे, अकाउंट्सची 04 पदे आणि पीअँडएस, क्यूए, आयटी व सुरक्षेसाठी प्रत्येकी एका पदासाठी भरती केली जाईल.
शैक्षणिक पात्रता
अधिकृत अधिसूचना उपलब्ध झाल्यानंतर उमेदवार एनटीपीसी भरती 2022 शी संबंधित शैक्षणिक पात्रता, वय, पगार यासह इतर माहिती पाहू शकतील.
अर्ज कसा करावा.
- एनटीपीसी करिअरच्या careers.ntpc.co.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- रिन्युएबल एनर्जीशी संबंधित जाहिरात क्रमांक 18/22 वर क्लिक करा.
- तुमचे तपशील एंटर करा आणि पेमेंट करा.
- शेवटी सबमिट बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर अर्जाची प्रिंट काढा.