पासपोर्ट ऑफिसर बनण्याची संधी, १.५ लाख पगार; कुठे आणि कसा कराल अर्ज? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 03:10 PM2022-08-02T15:10:36+5:302022-08-02T15:11:51+5:30

पदवी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. पासपोर्ट ऑफीसमध्ये भरती केली जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून पासपोर्ट ऑफीसर पदासाठी जागा भरल्या जात आहेत.

Opportunity to become Passport Officer Salary 1 5 lakh permonth how to apply click here | पासपोर्ट ऑफिसर बनण्याची संधी, १.५ लाख पगार; कुठे आणि कसा कराल अर्ज? वाचा...

पासपोर्ट ऑफिसर बनण्याची संधी, १.५ लाख पगार; कुठे आणि कसा कराल अर्ज? वाचा...

Next

पदवी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. पासपोर्ट ऑफीसमध्ये भरती केली जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून पासपोर्ट ऑफीसर पदासाठी जागा भरल्या जात आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकातापासून हैदराबाद, नागपूर, मदुराईसह एकूण २१ शहरांमध्ये भरती (Passport Officer Recruitment 2022 ) निघाली आहे. 

नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. नोकरी मिळताच पगारही भरघोस मिळणार आहे. पासपोर्ट ऑफीसच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच passportindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोकरीबाबतची संपूर्ण माहिती मिळवू शकता. भारत सरकारकडून नोकरीसाठीचं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं असून परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत पासपोर्ट ऑफीसर आणि डेप्युटी ऑफीसर पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत. कोणकोणत्या शहरात किती जागा आणि पगार किती ते जाणून घ्या...

कोणकोणत्या शहरात भरती
>> मदुराई- १ जागा (या ठिकाणी पासपोर्ट ऑफीसर पदासाठी जागा आहे) इतर सर्व ठिकाणी डेप्युटी पासपोर्ट ऑफीसर पदासाठी भरती केली जाणार आहे. 

>> अमृतसर, बरेली, जालंधर, जम्मू, नागपूर, पणजी, रायपूर, शिमला, श्रीनगर, सरत या शहरांसाठी एकूण १० जागा. प्रत्येक शहरात एक जागा भरली जाणार आहे. 

>> अहमदाबाद- १ जागा
>> चंदीगड- १ जागा
>> दिल्ली- २ जागा
>> गुवाहाटी- १ जागा
>> हैदराबाद- १ जागा
>> जयपूर- १ जागा
>> कोलकाता- २ जागा
>> कोझिकोड- १ जागा
>> मुंबई- २ जागा
>> पुणे- १ जागा

Passport Officer Salary पगार किती?
पासपोर्ट ऑफिसरचा पगार लेव्हल १२ अनुसार असणार आहे. पे स्केल ७८,८०० रुपयांपासून २.०९ लाख रुपये दरमहा इतका असणार आहे. याशिवाय DA, HRA सह इतर भत्तेही दिले जाणार आहेत. सर्वांचा हिशोब करायचा झाला तर पासपोर्ट ऑफीसरचा सुरुवातीचा पगार दरमहा १.५० लाख रुपये इतका असेल. तर डेप्युटी पासपोर्ट ऑफीसरबाबत बोलायचं झालं तर यांना लेव्हल ११ नुसार पगार दिला जाणार आहे. पे स्केल ६७,७०० रुपये ते २.८ लाख रुपये दरमहा पगार मिळू शकतो. म्हणजेच सुरुवातीचा पगार १.३० लाख रुपये दरमहा इतका असेल. 

Passport Office Job साठी कसा अर्ज कराल?
ऑनलाइन पद्धतीनं नोकरीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी तुम्हाला पुढील लिंकवर क्लिक करता येईल. यात तुम्हाला नोकरीबाबतची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. तसंच फॉर्म आणि बायोटेडाटा फॉरमॅट देखील यात नमूद करण्यात आला आहे. येथे क्लिक करा

Web Title: Opportunity to become Passport Officer Salary 1 5 lakh permonth how to apply click here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.