PGCIL मध्ये 1000 हून अधिक शिकाऊ पदांसाठी भरती; जाणून घ्या, कोण करू शकतं अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 11:44 AM2023-07-02T11:44:38+5:302023-07-02T11:45:06+5:30

PGCIL Apprentice Recruitment 2023 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून (PGCIL) शिकाऊ पदांसाठी भरती केली जाणार आहे. 

pgcil apprentice recruitment 2023 govt job for iti holders llb engineers apply at powergrid in | PGCIL मध्ये 1000 हून अधिक शिकाऊ पदांसाठी भरती; जाणून घ्या, कोण करू शकतं अर्ज?

PGCIL मध्ये 1000 हून अधिक शिकाऊ पदांसाठी भरती; जाणून घ्या, कोण करू शकतं अर्ज?

googlenewsNext

नवी दिल्ली : जर तुमच्याकडे अभियांत्रिकीची (इंजिनीअरिंग) पदवी असेल किंवा तुम्ही एलएलबी धारक असाल, तर तुम्हाला सरकारी नोकरी मिळण्याची एक उत्तम संधी आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून (PGCIL) शिकाऊ पदांसाठी भरती केली जाणार आहे. 

दरम्यान, उमेदवार PGCIL Recruitment च्या अधिकृत वेबसाइट powergrid.in वर जाऊन या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. PGCIL ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 1 जुलै 2023 पासून शिकाऊ पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी 31 जुलै 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या रिक्त जागांसाठी परीक्षेची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स पाहू शकता.

असा करा अर्ज
- डायरेक्ट अर्ज करण्यासाठी सर्वात आधी powergrid.in अधिकृत वेबसाइटवर जा.
- वेबसाइटच्या होम पेजवर LATEST NEWS च्या लिंकवर क्लिक करा.
- नेक्स्ट पेजवरील PGCIL Apprentices 2023 2023 Apply Online for 1045 Post च्या लिंकवर जा.
- याठिकाणी मागितलेल्या माहितीपूर्वी रजिस्ट्रेशन करा.
- रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही अॅप्लिकेशन फॉर्म भरू शकता.

शुल्क भरण्याची गरज नाही
या रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आयटीआय धारकांपासून ते अभियंते आणि एलएलबी पास या रिक्त पदासाठी अर्ज करू शकतात.

पात्रता 
जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, शिकाऊ उमेदवारासाठी या रिक्त पदांसाठी वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पात्रता ठेवण्यात आली आहे. यामध्ये डिप्लोमा सिव्हिलसाठी अर्ज करणाऱ्यांकडे सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी असावी. दुसरीकडे, मास कम्युनिकेशनमध्ये पदवीधर असलेले लोक पीआर असिस्टंटच्या पदासाठी अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा
अशा प्रकारे Law Executive च्या पदावर नोकरीसाठी LLB Holder अर्ज करण्यास पात्र आहेत. उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्यांना कमाल वयोमर्यादेत सवलत देण्याची तरतूद आहे. अधिक तपशीलांसाठी अधिकृत सूचना पहा.
 

Web Title: pgcil apprentice recruitment 2023 govt job for iti holders llb engineers apply at powergrid in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.