PGCIL Recruitment 2021: पावर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये मोठी भरती; २७ ऑगस्टपर्यंत अर्जाची शेवटची मुदत, पगार किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 12:40 PM2021-08-19T12:40:59+5:302021-08-19T12:41:38+5:30

PGCIL Recruitment 2021: पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये फिल्ड इंजिनिअर पदासाठी नोकर भरती निघाली आहे.

PGCIL Recruitment 2021 Vacancy for Field Engineer Post in Power Grid Corporation of India | PGCIL Recruitment 2021: पावर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये मोठी भरती; २७ ऑगस्टपर्यंत अर्जाची शेवटची मुदत, पगार किती?

PGCIL Recruitment 2021: पावर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये मोठी भरती; २७ ऑगस्टपर्यंत अर्जाची शेवटची मुदत, पगार किती?

googlenewsNext

PGCIL Recruitment 2021: पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये फिल्ड इंजिनिअर पदासाठी नोकर भरती निघाली आहे. यात एकूण १३७ जागांवर भरती केली जाणार आहे. इच्छुकांना powergridindia.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज दाखल करता येऊ शकणार आहे. 

फिल्ड इंजिनिअर पदावरील या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १३ ऑगस्ट २०२१ पासून सुरू झाली आहे. यात अर्ज शुल्क भरण्याची अंतिम मुदत २७ ऑगस्ट २०२१ पर्यंत देण्यात आली आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. अर्ज दाखल करण्याआधी पावर ग्रिड कॉर्पोरेशनच्या अधिकृत संकेतस्थळावर नोकरीबाबत देण्यात आलेली सर्व माहिती उमेदवारांनी व्यवस्थित वाचावी. २७ ऑगस्ट अर्जाची शेवटची तारीख असून त्यानंतर कोणत्याही उमेदवाराला अर्ज करता येणार नाही. (PGCIL Recruitment 2021 Vacancy for Field Engineer Post in Power Grid Corporation of India)

अर्जाची प्रक्रिया
फिल्ड इंजिनिअर आणि फिल्ड सुपरवायझर पदासाठी ऑनलाइन पद्धतीनं अर्ज दाखल करावा लागणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी powergrid.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर करिअर सेक्शनमध्ये जाऊन त्यातील Opportunities या पर्यायावर क्लिक करावं. पुढे नोकर भरतीबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला दिसेल. त्यानुसार इच्छुक पदासाठी तुम्ही अर्ज दाखल करू शकता. 

कोणकोणत्या पदांवर भरती
फिल्ड इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)- ४८ जागा
फिल्ड इंजिनिअर (सिविल)- १७ जागा
फिल्ड सुपरवायझर( इलेक्ट्रिकल)- ५० जागा
फिल्ड सुपरवायझर (सिविल)- २२ जागा

पात्रता काय?
फिल्ड इंजिनिअर पदासाठी इच्छुक उमेदवाराचं कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात बीई आणि बीटेकची पदवी प्राप्त केलेली असणं गरजेचं आहे. याशिवाय इच्छुक उमेदवाराचं वय २९ वर्षांपेक्षा अधिक नसावं. उमेदवाराकडे डिम्लोमा B.Sc, BE/B.Tech, M.Tech/ME ची पदवी असणं गरजेचं आहे. 

पगार किती?
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३० हजार रुपयांपासून ते १ लाख २० हजार रुपयांपर्यंतचं वेतन मिळू शकतं. यासाठी उमेदवारांची निवड स्क्रीनिंग टेस्ट, मुलाखतीतील कामगिरीवर केली जाणार आहे. 

Read in English

Web Title: PGCIL Recruitment 2021 Vacancy for Field Engineer Post in Power Grid Corporation of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.