PGCIL Recruitment 2022: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; ३१ जुलैपर्यंत करा अर्ज!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 10:41 PM2022-07-17T22:41:38+5:302022-07-17T22:42:15+5:30

PGCIL Recruitment 2022: 31 जुलै 2022 पर्यंत उमेदवार PGCILच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

PGCIL Recruitment 2022 Apply Online For Apprentice Posts At Powergrid In Check Details | PGCIL Recruitment 2022: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; ३१ जुलैपर्यंत करा अर्ज!

PGCIL Recruitment 2022: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; ३१ जुलैपर्यंत करा अर्ज!

googlenewsNext

नवी दिल्ली : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (PGCIL) इलेक्ट्रीशियन आणि एचआर एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज मागवले आहेत. याअंतर्गत शिकाऊ उमेदवारांची 1166 पदे भरण्यात येणार आहेत. 31 जुलै 2022 पर्यंत उमेदवार PGCILच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेअंतर्गत, कॉर्पोरेट सेंटर, गुरुग्राम, फरिदाबाद, जम्मू, लखनऊ, पाटणा, कोलकाता, शिलाँग, ओडिशा प्रकल्प, भुवनेश्वर, नागपूर, बडोदा, हैदराबाद आणि बंगळुरू येथे भरती केली जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना NAPS किंवा NATS वेबसाइटवर नोंदणी करणे अनिवार्य आहे.

महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुरूवात झालेली तारीख – 07 जुलै 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2022

शैक्षणिक पात्रता
इलेक्ट्रीशियन - इलेक्ट्रीशियनमध्ये आयटीआय आणि इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा.
डिप्लोमा (सिव्हिल) - सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा.
ग्रॅज्युएट (इलेक्ट्रिकल) - इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा.
एचआर एक्झिक्युटिव्ह - एमबीए (एचआर) / कार्मिक व्यवस्थापनात पदव्युत्तर डिप्लोमा.
सीएसआर एक्झिक्युटिव्ह - मास्टर इन सोशल वर्क (MSW) किंवा रुरल डेव्हलपमेंट.

किती मिळेल वेतन?
ग्रॅज्युएट- 15,000 रुपये
एक्झिक्युटिव्ह  15,000 रुपये
डिप्लोमा- 12,000 रुपये

कोण अर्ज करू शकत नाही?
- ज्यांचे अंतिम परीक्षेचे निकाल आलेले नाहीत.
- ज्याने वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली नाहीत.
- कोणत्याही कालावधीसाठी कोणत्याही संस्थेमध्ये शिकाऊ प्रशिक्षण घेतले आहे.
- ज्याच्याजवळ 1 वर्षापेक्षा जास्त कामाचा अनुभव आहे.

Web Title: PGCIL Recruitment 2022 Apply Online For Apprentice Posts At Powergrid In Check Details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.