रोजगार मेळाव्याद्वारे 71000 तरुणांना मिळाली नोकरी; 13 एप्रिलला PM मोदी देणार नियुक्ती पत्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 03:52 PM2023-04-11T15:52:58+5:302023-04-11T15:53:47+5:30

Rozgar Mela 2023 : रोजगार मेळाव्याच्या यशस्वी प्रयत्नांची माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नोकऱ्या मिळवणाऱ्या तरुणांनाही संबोधित करतील

pm modi to distribute 71000 appointment letters to newly recruits in govt rozgar mela | रोजगार मेळाव्याद्वारे 71000 तरुणांना मिळाली नोकरी; 13 एप्रिलला PM मोदी देणार नियुक्ती पत्रे

रोजगार मेळाव्याद्वारे 71000 तरुणांना मिळाली नोकरी; 13 एप्रिलला PM मोदी देणार नियुक्ती पत्रे

googlenewsNext

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या पीएम रोजगार मेळा योजनेतून नोकरी मिळवणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नियुक्ती पत्र देणार आहेत. यादरम्यान जवळपास 71,000 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. 

रोजगार मेळाव्याच्या यशस्वी प्रयत्नांची माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नोकऱ्या मिळवणाऱ्या तरुणांनाही संबोधित करतील. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'रोजगार मेळावा' मोहिमेअंतर्गत सुमारे 71,000 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले होते. पीएमओने दिलेल्या माहितीनुसार, विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही नियुक्ती पत्रे वितरित करण्यात आली.

देशभरातून नव्याने निवडलेल्या तरुणांना भारत सरकारच्या अंतर्गत ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, सीनियर कमर्शियल कम तिकीट क्लर्क, इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफर, ज्युनिअर अकाउंटेंट, पोस्टल असिस्टंट, आयकर अशा विविध पदांवर काम करण्याची संधी मिळते. याशिवाय, टॅक्स इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, सीनिअर ड्राफ्ट्समन, जेई/सुपरवायजर, असिस्टंट प्रोफेसर, टीचर, लायब्रेरियन, नर्स, प्रोबेशनरी ऑफिसर, पीए, एमटीएस या पदांवर नोकऱ्या मिळतील.

10 लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचे उद्दिष्ट
गेल्या वर्षी जूनमध्ये आपल्या एका निवेदनात म्हटले होते की, सरकार मोठ्या प्रमाणात नोकऱ्या देण्याची तयारी करत आहे. त्यानुसार 1 ते 1.5 वर्षात 10.5 लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकार विविध विभागांतर्गत तरुणांना नोकऱ्या देणार आहे. नव्याने भरती झालेल्या तरुणांना 'कर्मयोगी प्रारंभ'द्वारे स्वतःला प्रशिक्षण देण्याची संधीही मिळणार आहे. दरम्यान, कर्मयोगी प्रारंभ हा विविध सरकारी विभागांमध्‍ये सर्व नवीन भरती करणार्‍यांसाठी एक ऑनलाइन ओरिएंटेशन कोर्स आहे.

Web Title: pm modi to distribute 71000 appointment letters to newly recruits in govt rozgar mela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.