Post Office Recruitment 2022: पोस्ट विभागात बंपर भरती, १ लाखाहून अधिक जागा भरणार; पात्रता आणि पगार किती? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 03:37 PM2022-08-17T15:37:28+5:302022-08-17T15:38:36+5:30

Post Office Recruitment 2022: सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय टपाल खात्यात बंपर भरती केली जाणार आहे.

post office recruitment 2022 big vacancy in indian posts one lakh posts know qualification and salary | Post Office Recruitment 2022: पोस्ट विभागात बंपर भरती, १ लाखाहून अधिक जागा भरणार; पात्रता आणि पगार किती? जाणून घ्या...

Post Office Recruitment 2022: पोस्ट विभागात बंपर भरती, १ लाखाहून अधिक जागा भरणार; पात्रता आणि पगार किती? जाणून घ्या...

googlenewsNext

Post Office Recruitment 2022: सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय टपाल खात्यात बंपर भरती केली जाणार आहे. पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमन, मेल गार्डसह इतर अनेक पदांवर ही भरती केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार इंडिया पोस्टच्या वेबसाइट, indiapost.gov.in वरून अधिसूचनेबद्दल माहिती मिळवू शकतात. भारतीय टपाल खात्यानं या नोकर भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीनं अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवारांना वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करून तो भरून विहित वेळेपूर्वी पाठवावा लागणार आहे. 

India Post Recruitment 2022: रिक्त जागांचा तपशील
भारतीय टपाल विभाग या भरतीद्वारे ९८,०८३ नोकऱ्या देणार आहे. देशभरातील २३ मंडळांमध्ये पोस्ट ऑफिसच्या नोकऱ्यांसाठी सरकारनं परवानगी दिली आहे. 

India Post Recruitment 2022: शैक्षणिक पात्रता
टपाल खात्यात नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या तरुणांनी मान्यताप्राप्त मंडळातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण करणं गरजेचं असणार आहे. यासोबतच संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे. दुसरीकडे, काही रिक्त पदांसाठी उमेदवारांनी इंटरमीडिएट म्हणजेच इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. टपाल विभागानं प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे पात्रता निश्चित केली असल्यानं शैक्षणिक आवश्यकता जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी इंडिया पोस्टच्या अधिकृत नोटिफिकेशनची माहिती घेणं आवश्यक आहे.

भारतीय टपाल विभागानं पोस्ट ऑफिसच्या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या तरुणांचं किमान वय १८ वर्षे आणि कमाल ३२ वर्षे निश्चित केलं आहे.

India Post Recruitment 2022: अर्ज प्रक्रिया
भारतीय टपाल विभागाच्या या एक लाख रिक्त जागांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी indiapostgdsonline.gov.in या भारतीय पोस्टच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. यानंतर, रिक्त पदांची अधिसूचना पाहण्यासाठी होमपेजवर दिलेल्या भरती विभागावर क्लिक करा आणि सूचनांनुसार अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

India Post Recruitment 2022: शेवटची तारीख
या पदांसाठी २३ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ऑफलाइन पद्धतीनं अर्ज स्वीकारले जातील. स्पीड पोस्ट किंवा नोंदणीकृत पोस्टानं नमूद पत्त्यावर अर्ज पाठवावे लागणार आहेत.

Web Title: post office recruitment 2022 big vacancy in indian posts one lakh posts know qualification and salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.