पटकन शिका, ताबडतोब कमवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 03:00 AM2018-06-18T03:00:28+5:302018-06-18T03:00:28+5:30
फोटोग्राफी ही एकच कला अशी आहे की, ती थोड्या अवधीत शिकता येते व ताबडतोब उत्पन्नाचे साधन करता येते.
फोटोग्राफी ही एकच कला अशी आहे की, ती थोड्या अवधीत शिकता येते व ताबडतोब उत्पन्नाचे साधन करता येते. फोटोग्राफीत तांत्रिकतेचा भाग बराच असल्यामुळे जेवढा अभ्यास करावा तेवढा तो थोडाच ठरतो. डिजिटल फोटोग्राफीमुळे तर त्याच्या कक्षा दूरवर गेल्या आहेत. यामुळे कॉम्प्युटरच्या तत्त्वावर केलेला डिजिटल कॅमेरा म्हणजे गेल्या शतकाच्या शेवटी मिळालेले वरदान आहे, असे म्हणावे लागेल.
करिअरच्या दृष्टीने पाहिले तर फोटोग्राफीच्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील शंभर नावे तरी चांगली उंची गाठलेल्या फोटोग्राफर्सची घेता येतील. उत्तम नजर, कलात्मक दृष्टीकोन आणि शारीरिक लवचीकता या फोटोग्राफरच्या प्राथमिक आवश्यकता आहेत. त्याच्याच जोडीला संयम, समयसूचकता, कल्पकता, कौशल्य, स्वतंत्रपणे आणि त्याचबरोबर समूहात काम करता येण्याइतपत
स्वाभाविक उमदेपणा एवढी ही वैशिष्ट्येही आवर्जून जोपासता यायला हवीत.
स्वतंत्र उद्योग करू इच्छिणाऱ्यांकडे धंद्याची उत्तम जाण असायला हवी. अनपेक्षित घटना हा या व्यवसायातील स्थायिभावच आहे हे लक्षात घेऊन दीर्घकाळ काम करण्याची मानसिक तयारीसुद्धा ठेवावी लागते. विशेषत: प्रेस फोटोग्राफरना अशा प्रसंगाला बहुतेक वेळा तोंड द्यावे लागते. फोटोग्राफर हा बहुलक्षी, बहुश्रुत व बहुढंगी असणार आहे हे लक्षात घेऊन फोटोग्राफीच्या संदर्भातील नियतकालिकांचे नित्य वाचन, फोटोग्राफी क्लब मेंबर, फोटोग्राफी प्रदर्शने, प्रशिक्षण शिबिरे अशा प्रगत गोष्टींचा सातत्याने स्वीकार करणे अपरिहार्य आहे. जोडीला संगणकाच्या प्रगतीमुळे फोटोग्राफीची मूलतंत्रेसुद्धा झपाट्याने बदलू लागली आहेत.
आता फिल्मच्या जागी तबकडी आली असून कॅमेºयातच फोटोग्राफ जमवून ठेवता येतील, असे तंत्रज्ञान आले आहे. या पार्श्वभूमीवर फोटोग्राफी क्षेत्रातील विशेष शाखा समजल्या की मग फोटोग्राफीत करिअर करण्यासारखे काय आहे, या
प्रश्नाचे समर्पक उत्तर सापडेल. चला तर मग फोटोग्राफीची सफर करायला...
फोटोग्राफीचे व्यावसायिक अभ्यासक्रम तीन महिने ते दोन वर्षे कालावधीचे असतात. देशातील अनेक पॉलिटेक्निक, विद्यापीठे, आयटीआय तसेच अनेक खासगी शिक्षण संस्थांमधून हे शिक्षण प्राप्त होऊ शकते.
मास एज्युकेशनमध्ये (वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरचित्रवाणी इ. प्रसारमाध्यमे) फोटोग्राफी हा एक विषय असतो. बॅचलर आॅफ फाइन आर्ट या अभ्यासक्रमात आणि आता बॅचलर आॅफ मास मीडियामध्येही फोटोग्राफीचा तंत्रशुद्ध अभ्यास करता येतो.फोटोग्राफर हा बहुलक्षी, बहुश्रुत व बहुढंगी असणार आहे हे लक्षात घेऊन फोटोग्राफीच्या संदर्भातील नियतकालिकांचे नित्य वाचन, फोटोग्राफी क्लब मेंबर, फोटोग्राफी प्रदर्शने, प्रशिक्षण शिबिरे अशा प्रगत गोष्टींचा सातत्याने स्वीकार करणे अपरिहार्य आहे.
>प्रेस फोटोग्राफी : प्रेस फोटोग्राफी ही पत्रकारितेप्रमाणे अत्यंत धकाधकीची शाखा. प्रेस फोटोग्राफर्सना प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटनांचे साक्षीदार व्हावे लागते. भटकंती मागे लागल्याने कामाच्या वेळा अनियमित राहतात. अपेक्षित घटना ते ज्ञात घटना साºयाच गोष्टी तत्परतेने टिपून त्या वृत्तपत्रांपर्यंत पोहोचविणे अग्रक्रमाने करावे लागते. प्रसंगांचे गांभीर्य, गोपनीयता सांभाळता येणे अत्यंत आवश्यक आहे.
>फोटो जर्नालिझम
प्रेस फोटोग्राफी आणि फोटो जर्नालिझममधील प्रमुख फरक म्हणजे त्यांनी निर्माण केलेला अंतिम परिणाम. प्रेस फोटोग्राफर एखादा प्रसंग चित्रित करतो तर फोटो जर्नालिस्ट एखाद्या प्रसंगाची मालिका (सार्क परिषद, लोकसभेतील कामकाज, शिखर वार्ता परिषदा इ.) निर्माण करतो. त्यावर आपले मतप्रदर्शन करू शकतो. फोटो जर्नालिस्टना समोरच्या प्रसंगांमध्ये रुची असणे, लोकांशी सुसंवाद करता येणे गरजेचे मानले जाते.
>पोर्टेचर (व्यक्तिचित्रण) : व्यक्तिचित्रण हा फोटोग्राफीचा प्रकार फोटो स्टुडिओशी संलग्न असतो. फॅशन मॉडेलिंग करू इच्छिणाºया व्यक्तींचे छायाचित्रण करून त्यांचे अल्बम बनविणे हा या शाखेतील कुशल असलेल्यांचा प्रमुख व्यवसाय! लोकांच्या गरजा, त्यांची राहणी, त्याचं सकृतदर्शन यांच्यामध्ये रुची असल्याशिवाय या शाखेत करिअर करू नये. पोर्टेचर फोटोग्राफर्सना बोलघेवडेपणा, भक्कमपणा, सहवेदना व स्पष्टवक्तेपणा जोपासावा लागतो. मित्तर बेडी, गौतम राजाध्यक्ष अशा काही नामवंत मंडळींचा वावर फिल्मीजगतात होऊ शकला याचे प्रमुख कारण त्यांची स्वाभाविक व्यक्तिवैशिष्ट्येही आहेत.
>इंडस्ट्रियल फोटोग्राफी : ही शाखा गेल्या तीन दशकांत उत्तम प्रकारे प्रगत झाली आहे. या फोटोग्राफीमध्ये कंपन्यांचे अहवाल, संचालक मंडळाच्या सभा, कंपनी नियतकालिके शिवाय उत्पादनाचे छायाचित्रण अशा गोष्टींचा समावेश होतो. विशेषत: कंपन्यांमध्ये पूर्ण वेळ काम करणारा फोटोग्राफर बहुधा नेमला न जाण्यामुळे स्वतंत्रपणे काम करणाºया फोटोग्राफर्सना या शाखेत उत्तम संधी प्राप्त होते. (हिंदुस्थान पेट्रोलियम, लार्सन अॅॅण्ड टूब्रो, राष्ट्रीय फर्टिलायझर्ससारख्या विस्ताराने प्रचंड असणाºया कंपन्यांमध्ये काही फोटोग्राफर्सना बारमाही काम प्राप्त होते.) इंडस्ट्रियल फोटोग्राफीमध्ये आता मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स प्रगत होत आहे. आगामी काळात मायक्रो फिल्मिंगद्वारे कंपन्या, संस्था इ. सर्वांची रेकॉर्ड्स हेच लोक सांभाळणार आहेत.
>कमर्शियल फोटोग्राफी
फोटोग्राफीमधील ही पारंपरिक शाखा. उत्तम कॅमेरा प्राप्त करून विशेष प्रसंगांचे चित्रण करणे, फोटो स्टुडिओ प्रस्थापित करणे, डेव्हलपिंग, प्रिंटिंग, एन्लार्जमेंट, आयडेंटिटी कार्ड फोटो इ. गोष्टी हा छायाचित्रकार करीत असतो. जोडीला कॅमेरे, फिल्म्स, अल्बम्स, बॅटरी, सेल्स, लाइट शेड्स अशा फोटोग्राफीला लागणाºया साहित्याची विक्री करून ग्राहकांची सोय करतानाच आपल्या उत्पन्नात भर टाकू शकतो.
>फॅशन फोटोग्राफी
जाहिरात आणि फॅशन फोटोग्राफीमध्ये जाहिरात कंपन्या, मॉडेल्स आणि अनेक माध्यमे यांच्याशी व्यावसायिक संबंध ठेवून यशस्वी होता येते. या शाखेमध्ये उत्पन्नाचा स्तर उच्च दर्जाचा असतो. त्याचप्रमाणे कलात्मकता आणि कौशल्य अत्युच्च प्रतीची असेल तर शैक्षणिक पात्रतेला फारसे महत्त्व दिले जात नाही हे विशेष!
>मेडिकल, टेक्निकल, सायंटिफिक फोटोग्राफी
माहिती आणि माहितीचे पृथक्करण यासाठी ही फोटोग्राफी वापरली जाते. वैद्यकीय शाखा, पोलीस डिटेक्टिव्ह, इन्व्हेस्टिगेशन शाखा यांना यातील तज्ज्ञांची गरज भासते. फॉरेन्सिक फोटोग्राफी हा यातीलच एक प्रभाग आहे. गुन्हे अन्वेषण, चोºया, अपघात अशांसाठी रेकॉर्ड निर्माण करण्यासाठी ही फोटोग्राफी जास्त प्रमाणावर आजकाल वापरली जात आहे.