Railway Recruitment 2021: रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, दहावी पास उमेदवारांनाही करता येईल अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 08:40 AM2021-09-18T08:40:50+5:302021-09-18T08:43:00+5:30
Railway Recruitment 2021, Sarkari Naukri 2021: उमेदवार rrcnr.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात.
Railway Recruitment 2021, Sarkari Naukri 2021: भारतीय रेल्वे प्रशासनाने कोरोना संकटादरम्यान 3093 पदांची भरती जारी केली आहे. विशेष म्हणजे फक्त दहावी पास उमेदवार देखील नोकरीसाठी अर्ज दाखल करु शकतात.
ही भरती नवी दिल्लीतील लाजपत नगर येथील उत्तर रेल्वेच्या (RRC NR) रेल्वे रिक्रूटमेंट सेलद्वारे 3093 अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना कायदा 1961 अंतर्गत अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार rrcnr.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर आहे.
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातील आयटीआय पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवार अधिसूचनेमध्ये वयोमर्यादेसह इतर विहित पात्रतांची माहिती तपासू शकतात.
महत्वाच्या तारखा :
अर्ज करण्याची तारीख : 20 सप्टेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2021
इच्छुक उमेदवार 20 ऑक्टोबरपर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात. यासाठी तुम्हाला rrcnr.org या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमच्या माहितीसह नोंदणी करावी लागेल. दहावीच्या उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. उमेदवार अधिकृत अधिसूचनेमध्ये अॅप्रेंटिसशिप दरम्यान उपलब्ध असलेल्या स्टायपेंडसह इतर सुविधांची माहिती तपासू शकतील.
दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात बेरोजगारी वाढल्यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागल्या. या बिकट परिस्थितीमध्ये अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये काही सरकारी कंपन्या, बँका आणि रेल्वेने बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.