Railway Recruitment 2021: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी, अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 11:05 AM2021-09-13T11:05:34+5:302021-09-13T11:12:30+5:30
Railway Recruitment 2021: पात्र आणि इच्छुक उमेदवार रेल्वे व्हील फॅक्टरीची (RWF) वेबसाइट rwf.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज डाउनलोड करून भरू शकतात.
Rail Wheel Factory Apprentice Recruitment 2021: रेल्वेने ट्रेड अॅप्रेंटिसच्या 192 रिक्त जागांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत, ज्यासाठी 10 वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी आहे. दरम्यान, नोकरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 सप्टेंबर 2021 आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार रेल्वे व्हील फॅक्टरीची (RWF) वेबसाइट rwf.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज डाउनलोड करून भरू शकतात.
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डाकडून 50% गुणांसह 10 वी आणि संबंधित विषयात नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT) मधून नॅशनल ट्रेड अॅप्रेंटिस सर्टिफिकेट मिळवणे आवश्यक आहे.
आरडब्ल्यूएफ ट्रेड अप्रेंटिस वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे आहे (सरकारी निकषांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत शिथिलता प्रदान केली जाईल). अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
#EPFO आणि आधार नंबर लिंक केले नाही, तर तुमच्या खात्यात कंपनीकडून येणारे योगदान थांबवले जाईल. https://t.co/GChdgWx2Id
— Lokmat (@MiLOKMAT) September 13, 2021
वेतन
निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 12,261 रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल.
निवड कशी होईल?
रेल्वे व्हील फॅक्टरी ट्रेड अप्रेंटिसच्या पदांसाठी उमेदवारांची निवड इयत्ता 10 वी मधील गुण आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.
#Zomato कडून #Grocery डिलिव्हरी सर्व्हिस बंद करण्याचा निर्णय; जाणून घ्या, काय आहे कारण? https://t.co/wQyohWuQU4
— Lokmat (@MiLOKMAT) September 13, 2021
इच्छुक उमेदवार कागदपत्रांसह अर्ज मुख्य मुख्य कार्मिक अधिकारी, कार्मिक विभाग, रेल व्हील फॅक्टरी, येलहंका, बंगलोर -560064 यांच्या कार्यालयात 13 सप्टेंबर 2021 पर्यंत पाठवू शकतात.