रेल्वेत निघाली बंपर लोकोपायलट भरती; ९९७० जागा भरणार, १० वी पास, ITI वाले, तुम्ही करू शकता अर्ज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 14:26 IST2025-03-26T14:23:34+5:302025-03-26T14:26:05+5:30

Railway Loco Pilot Job: रेल्वेने अर्जाच्या तयारीसाठी १५ दिवसांचा वेळ दिला आहे, त्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. दहावी आणि आयटीआयचा यापैकी एक कोर्स...

Railway Loco Pilot Government Job alert: Railways has started recruitment of bumper locopilots; 9970 posts will be filled, 10th pass, ITI holders, you can apply... | रेल्वेत निघाली बंपर लोकोपायलट भरती; ९९७० जागा भरणार, १० वी पास, ITI वाले, तुम्ही करू शकता अर्ज...

रेल्वेत निघाली बंपर लोकोपायलट भरती; ९९७० जागा भरणार, १० वी पास, ITI वाले, तुम्ही करू शकता अर्ज...

रेल्वे खात्याने मोठी भरती जाहीर केली आहे. साध्या सुध्या पदासाठी नाही तर रेल्वे इंजिने चालविणाऱ्या लोको पायलट पदासाठी ही भरती काढण्यात आली आहे. आरआरबी असिस्टंट लोकोपायलट या पोस्टसाठी तब्बल ९९७० जागा भरल्या जाणार आहेत. महत्वाचे म्हणजे रेल्वेने अर्जाच्या तयारीसाठी १५ दिवसांचा वेळ दिला आहे, त्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. 

Railway ALP Recruitment 2025 साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १० एप्रिलपासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ९ मे असणार आहे. या काळात उमेदवार त्यांची कागदपत्रे तयार करू शकणार आहेत. वेगवेगळ्या झोनसाठी ही भरती असणार आहे. १० वी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. याचबरोबर त्यांच्याकडे एनसीव्हीटी/एससीव्हीटी, फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट, मेकॅनिक, मिलराईट, मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक रेडिओ आणि टीव्ही, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक मोटर व्हेईकल, वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिक डिझेल, हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट यापैकी एखाद्या अभ्यासक्रमाचा आयटीआय डिप्लोमाचे प्रमाणपत्र असायला हवे. 

सध्या रेल्वे एएलपीच्या १८७९९ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. सीबीटी-II परीक्षा पूर्ण झाली आहे. निकाल लवकरच जाहीर होईल. दरम्यान ही नवीन भरती देखील आली आहे.

वय, शैक्षणिक अर्हता आणि इतर गोष्टी तुम्ही या लिंकवर पाहू शकता. रेल्वेने लहान नोटीफिकेशन जारी केले आहे. डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा... RRB ALP Recruitment 2025 Short Notification PDF  

वयोमर्यादा - किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३३ वर्षे असावे. 

निवड प्रक्रिया- लेखी परीक्षा, कागदपत्रांची पडताळणी, वैद्यकीय चाचणी इत्यादी टप्प्यांच्या आधारे उमेदवार निवडले जाणार आहेत. 

 
 

Web Title: Railway Loco Pilot Government Job alert: Railways has started recruitment of bumper locopilots; 9970 posts will be filled, 10th pass, ITI holders, you can apply...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.