Railway Recruitment 2021: रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, आठवी पास उमेदवारांनाही करता येईल अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 03:45 PM2021-08-08T15:45:41+5:302021-08-08T15:52:55+5:30

Railway Recruitment 2021: जे उमेदवार रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप करण्यासाठी इच्छुक आहेत, ते मध्य रेल्वे (RRC NCR) च्या अधिकृत वेबसाइट rrcpryj.org ला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

railway recruitment 2021 : 1664 posts notification released  | Railway Recruitment 2021: रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, आठवी पास उमेदवारांनाही करता येईल अर्ज

Railway Recruitment 2021: रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, आठवी पास उमेदवारांनाही करता येईल अर्ज

googlenewsNext

railway recruitment 2021 : 1664 posts notification released 

RRC Railway 1664 Post Recruitment 2021, Sarkari Naukri 2021:  नॉर्थ सेंट्रल रेल्वेने अप्रेंटिसच्या 1664 रिक्त जागांवर पात्र उमेदवारांच्या भरतीसाठी नोटीफिकेशन जारी केले असून अर्ज मागविले आहेत. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 02 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. जे उमेदवार रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप करण्यासाठी इच्छुक आहेत, ते मध्य रेल्वे (RRC NCR) च्या अधिकृत वेबसाइट rrcpryj.org ला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. (railway recruitment 2021 : 1664 posts notification released)

प्रयागराज, झाशी आणि आगर विभागात उमेदवारांची भरती केली जाईल. यासाठी नेमलेल्या रिक्त पदांच्या संख्येची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. फिटर, वेल्डर, विंडर, मशिनिस्ट, सुतार, इलेक्ट्रिशियन, पेंटर, मेकॅनिक आणि वायरमन या ट्रेडमध्ये उमेदवारांची भरती केली जाईल.

या भरती मोहिमेद्वारे एकूण 1664 रिक्त जागा भरल्या जातील. 02 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 सप्टेंबर 2021 आहे. अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने किमान 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वेल्डर, वायरमन आणि सुतार व्यापारासाठी 8 वी पास देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. परीक्षा न घेता केवळ गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

अनारक्षित कॅटगरीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे, तर आरक्षित कॅटगरीतील उमेदवारांसाठी अर्ज निशुल्क आहे. इच्छुक उमेदवार rrcpryj.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोटिफिकेशनमधील सर्व आवश्यक माहिती तपासू शकतात. शेवटच्या तारखेपूर्वी आपल्या आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करु शकतात. 

Web Title: railway recruitment 2021 : 1664 posts notification released 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.