Railway Recruitment 2021: दहावी, बारावी पास असणाऱ्यांना रेल्वेत नोकरीची संधी! 1600 हून अधिक रिक्त पदांसाठी भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 12:33 PM2021-10-16T12:33:21+5:302021-10-16T12:41:42+5:30

Railway Recruitment 2021, Railway NCR Online Form 2021: अर्ज करण्यासाठी, 100 रुपये अर्ज शुल्क देखील भरावे लागेल. आरक्षित प्रवर्ग आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कामध्ये सूट दिली जाईल.

Railway Recruitment 2021: Job opportunities in Railways for 10th and 12th pass holders! Recruitment for more than 1600 vacancies | Railway Recruitment 2021: दहावी, बारावी पास असणाऱ्यांना रेल्वेत नोकरीची संधी! 1600 हून अधिक रिक्त पदांसाठी भरती

Railway Recruitment 2021: दहावी, बारावी पास असणाऱ्यांना रेल्वेत नोकरीची संधी! 1600 हून अधिक रिक्त पदांसाठी भरती

Next
ठळक मुद्देसंबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल.

Railway Recruitment 2021, Railway NCR Online Form 2021: रेल्वे रिक्रूटमेंट सेलने (RRC) नॉर्थ-सेंट्रल रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिपसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. रेल्वेत भरती होण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. ट्रेड अप्रेंटिसच्या 1600 हून अधिक रिक्त जागांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार rrcpryj.org वर नॉर्थ-सेंट्रल रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात आणि नोटिफिकेशन पाहून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. (Railway Recruitment 2021: Sarkari Naukri 1664 Act Apprentice Posts 12th Pass Can Apply)

'या' आहेत महत्वाच्या तारखा...  
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - 02 नोव्हेंबर 2021 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 01 डिसेंबर 2021

वयोमर्यादा
अर्ज करण्याची वयोमर्यादा 15 वर्षे ते 24 वर्षे आहे. 01 डिसेंबर 2021 पर्यंतचे वय ग्राह्य धरले जाईल. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार अधिकच्या वयोमर्यादेत सूटही दिली जाईल. एकूण 1664 रिक्त जागांवर उमेदवारांची भरती केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने किमान 50% गुणांसह दहावी, बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासह, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने
अर्ज करण्यासाठी, 100 रुपये अर्ज शुल्क देखील भरावे लागेल. आरक्षित प्रवर्ग आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कामध्ये सूट दिली जाईल. अर्ज ऑनलाईन स्वीकारले जातील ज्यांची शेवटची तारीख 01 डिसेंबर आहे. गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. जी ट्रेडनिहाय 10 व्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल. अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. इतर कोणतीही माहिती उमेदवार नोटिफिकेशनमध्ये तपासू शकतो.

Read in English

Web Title: Railway Recruitment 2021: Job opportunities in Railways for 10th and 12th pass holders! Recruitment for more than 1600 vacancies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.