Railway Recruitment 2021: रेल्वेत नोकरीची संधी, १६६४ रिक्त पदांसाठी भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 12:13 PM2021-08-15T12:13:31+5:302021-08-15T12:14:22+5:30

Railway Recruitment 2021: रेल्वेमध्ये नोकरी करण्यास इच्छुक उमेदवार एकूण १६६४ रिक्त जागांसाठी १ सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.

Railway Recruitment 2021: Job Opportunity in Railways, Recruitment for 1664 Vacancies | Railway Recruitment 2021: रेल्वेत नोकरीची संधी, १६६४ रिक्त पदांसाठी भरती

Railway Recruitment 2021: रेल्वेत नोकरीची संधी, १६६४ रिक्त पदांसाठी भरती

Next

Railway Recruitment 2021, Sarkari Naukri 2021: भारतीय रेल्वेत फिटर, वेल्डर, विंडर, मशीनिस्ट, कारपेंटर, इलेक्ट्रिशियन, पेंटर, मेकॅनिक आणि वायरमनच्या ट्रेड्सवर शिकाऊ उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. . (rrc railway recruitment 2021 notification released for 1664 apprentice posts)

रेल्वेमध्ये नोकरी करण्यास इच्छुक उमेदवार एकूण १६६४ रिक्त जागांसाठी १ सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांची भरती प्रयागराज, झाशी आणि आग्रा विभागात केली जाईल. उमेदवारांना अधिकृत अधिसूचनेत अर्ज, निवड आणि भरतीशी संबंधित संपूर्ण माहिती मिळू शकते

रेलवे रिक्रूटमेंट सेलच्या (RRC) अधिकृत rrcpryj.org वेबसाइटवर सविस्तर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया २ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. रेल्वेतील शिकाऊ उमेदवार ०१ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. लेव्हल १ पदांच्या थेट भरतीत २०% रिक्त जागांवरही उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. निवड लेल्या उमेदवारांना 18,000 रुपये ते 56,900 रुपये वेतन णीवर नियुक्त केले जाईल.

RRC Railway Recruitment 2021:

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यालयातून किमान ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वेल्डर, वायरमन आणि कारपेंटर ट्रेडसाठी ८ वी पास उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे, तर आरक्षित प्रवर्ग आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे. उमेदवारांची निवड गुणवत्तेनुसार केली जाईल.

Web Title: Railway Recruitment 2021: Job Opportunity in Railways, Recruitment for 1664 Vacancies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.