Railway: ना परीक्षा, ना मुलाखत थेट रेल्वेत नोकरी; दहावी पास झालेल्यांसाठी ६,८९१ पदांची भरती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 10:21 AM2021-10-06T10:21:48+5:302021-10-06T10:22:05+5:30
या पदांसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराकडे कुठल्याही मान्यता प्राप्त बोर्डाच्या शाळेतून १० वी पास प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे
नवी दिल्ली - कोरोनामुळं अनेकांच्या हातून रोजगार गेला आहे. त्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढली आहे. या तरुणांसाठी रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेलने अप्रेंटिसच्या विविध विभागासाठी एकूण ६ हजार ८९१ पदांसाठी नोकर भरती काढली आहे. ज्यात वेगवेगळ्या ट्रेड्सच्या जागा भरल्या जाणार आहेत. रेल्वे भरतीशी निगडीत आणखी माहिती जाणून घेऊया.
या पदांसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराकडे कुठल्याही मान्यता प्राप्त बोर्डाच्या शाळेतून १० वी पास प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे. त्याचसोबत उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील आयटीआयचं प्रमाणपत्र असावं. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी १०० रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावं लागणार आहे. या पदांसाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांचे वय १५ ते २४ या वयोगटातील हवे. योग्य उमेदवाराला कुठल्याही प्रकारची परीक्षा देण्याची गरज नाही.
उमेदवाराची निवड १० वी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या निवडीची मेरिट लिस्ट लावली जाईल. रेल्वे अप्रेंटिस भरती २०२१ च्या माध्यमातून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत विविध ट्रेड्ससाठी ४३२ जागा भरल्या जातील. तर ईस्टर्न रेल्वेत ३ हजार ३६६ तर उत्तर रेल्वेत ३ हजार ९३ जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. सर्व भरती ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. ज्यात ४३२ पदांसाठी १० ऑक्टोबर, ३ हजार ९३ पदांसाठी २० ऑक्टोबर २०२१, तर ३ हजार ३६६ पदांसाठी ३ नोव्हेंबर २०२१ या अंतिम तारखेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी रेल्वे भरतीच्या अधिक माहितीसाठी apprenticeshipindia.org या वेबसाईटवर भेट देऊन जाहिरात पाहू शकता आणि ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. निवडलेल्या उमेदवाराला अप्रेंटिसशिपच्या काळात सॅलरी, स्टाइपेंड देण्यात येईल. उमेदवार अन्य माहितीसाठी नोटिफिकेशन पाहू शकतात. त्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करावं.
रेल्वेत १० वी उत्तीर्ण आणि ITI झालेल्या उमेदवारांनी यावर क्लिक करावं.
रेल्वेत ३ हजार ३०० पदांच्या नोकर भरतीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करावं
रेल्वेत ३ हजार ९३ पदांच्या नोकर भरतीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करावं.