रेल्वेत पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी; पगार एक लाखापेक्षा जास्त, लगेच करा अर्ज...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 01:52 PM2023-10-26T13:52:09+5:302023-10-26T13:54:10+5:30
उमेदवार या पदांसाठी ११ नोव्हेंबर २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात.
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे कॉर्पोरेशनने (RCIL) सहाय्यक व्यवस्थापकासह (असिस्टंट मॅनेजर) अनेक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. २१ ऑक्टोबर २०२३ पासून या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच, उमेदवार या पदांसाठी ११ नोव्हेंबर २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट railtelindia.com ला भेट द्यावी लागेल. या रिक्त पदाबद्दल अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकतात. तसेच, या रिक्त पदांद्वारे, उमेदवार वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, शैक्षणिक पात्रता याबद्दल अधिक माहिती मिळवू शकतात.
रिक्त पदे किती?
सहाय्यक व्यवस्थापक (तांत्रिक) – २६ पदे
उपव्यवस्थापक (तांत्रिक) – २७ पदे
उपव्यवस्थापक (मार्केटिंग) – १५ पदे
सहाय्यक व्यवस्थापक (फायनान्स) – ६ पदे
सहाय्यक व्यवस्थापक (एचआर)-७ पदे
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाले तर एचआर, फायनान्स, मार्केटिंग या विषयात मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन तसेच बीई आणि बीटेक, बीएससी इंजिनीअरिंग, एमएससी पदवी, संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तसेच, अर्जच्या फीबद्दल बोलायचे तर, ओबीसी आणि सामान्य कॅटगरीतील उमेदवारांना १२०० रुपये आणि इतर कॅटगरीसाठी ६०० रुपये भरावे लागतील.
उमेदवारांची निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणीच्या आधारे केली जाईल. उमेदवारांची मुलाखतही घेतली जाईल. त्यानंतर उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. त्याचबरोबर, उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांचे मासिक वेतनही त्यांना दिले जाईल. या पदांसाठी मासिक वेतनाची रेंज ४०,००० ते १, ४०, ००० रुपयांपर्यंत असणार आहे.
उमेदवारांना असा करता येईल अर्ज...
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी पहिल्यांदा अधिकृत वेबसाइट raitelindia.com ला भेट द्यावी.
- वेबसाइटवर अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत अधिसूचना वाचावी.
- अर्जाशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे, स्वाक्षरी, फोटो, आयडी प्रूफ काळजीपूर्वक अपलोड करावे.
- त्यानंतर अर्जाची फी भरावी लागेल.
- अर्जाची फी भरल्यानंतर सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट आउट घ्या.