जिल्हा परिषदेत १९ हजार ४६० पदांची भरती; अर्ज करायची शेवटची तारीख कधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 12:13 PM2023-08-17T12:13:15+5:302023-08-17T12:14:07+5:30

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये क वर्गातील तब्बल १९ हजार ४६० पदे सरळ सेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

recruitment of 19 thousand 460 posts in zilla parishad | जिल्हा परिषदेत १९ हजार ४६० पदांची भरती; अर्ज करायची शेवटची तारीख कधी?

जिल्हा परिषदेत १९ हजार ४६० पदांची भरती; अर्ज करायची शेवटची तारीख कधी?

googlenewsNext

प्रा. राजेंद्र चिंचोले, स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शक

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये क वर्गातील तब्बल १९ हजार ४६० पदे सरळ सेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. मार्च २०१९ मध्ये सर्व जिल्हा परिषदांकडील गट- क मधील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता, कोरोना विषाणू प्रादुर्भावाची पार्श्वभूमी व इतर विविध कारणांमुळे परीक्षा होऊ शकली नाही. यानंतर ग्रामविकास विभागांतर्गत ही मेगा भरती करण्यात येत आहे.

शैक्षणिक पात्रता

पद क्र. १. आरोग्य पर्यवेक्षक : (i) विज्ञान शाखेतील पदवी (ii) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा १२ महिन्यांचा कोर्स
पद क्र. २. आरोग्य सेवक पुरुष : १० वी उत्तीर्ण
पद क्र. ३. आरोग्य सेवक महिला : सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद

जिल्हा परिषद भरतीद्वारे भरण्यात येणारी विविध पदे

आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहायक (लिपिक), कनिष्ठ सहायक (लेखा), तारतंत्री, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहायक लिपिक, वरिष्ठ सहायक लेखा, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी (पंचायत, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (बांधकाम/लघुपाटबंधारे), लघुलेखक (उच्चश्रेणी)

पदांची संख्या

अमरावती ६५३, सिंधुदुर्ग ३३४, अहमदनगर ९३७, गोंदिया ३३९, रत्नागिरी ७१५, नंदुरबार ४७५, वाशिम २४२, जळगाव ६२६, हिंगोली २०४, सांगली ७५४, नांदेड ६२८, नाशिक १०३८, परभणी ३०१, धाराशिव ४५३, यवतमाळ ८७५, पुणे १०००, कोल्हापूर ७२८, अकोला २८४, ठाणे २५५, धुळे ३५२, पालघर ९९१, बुलढाणा ४९९, रायगड ८४०, नागपूर ५५७, वर्धा ३७१, छत्रपती संभाजीनगर ४३२, बीड ५६८, चंद्रपूर ५१९, भंडारा ३२०, जालना ४६७, लातूर ४७६, सातारा ९७२, सोलापूर ६७४, गडचिरोली ५८१, एकूण १९४६०

- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - २५ ऑगस्ट २०२३
- वयोमर्यादा - सर्वसाधारण प्रवर्गासाठी १८ ते ४० वर्षे, मागास प्रवर्गासाठी १८ ते ४५ वर्ष
- परीक्षा शुल्क - सर्वसाधारण प्रवर्ग: रु. १०००,  मागास प्रवर्ग: रु. ९००

 

Web Title: recruitment of 19 thousand 460 posts in zilla parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.