राज्य उत्पादन शुल्क विभागात ५१२ पदांची भरती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 01:26 PM2023-06-07T13:26:32+5:302023-06-07T13:27:47+5:30
अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून आहे.
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात विविध कार्यालयांतील लघुलेखक, लघुटंकलेखक, जवान, वाहनचालक व शिपाई या संवर्गातील पदभरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून आहे.
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
लघुलेखक (निम्नश्रेणी) ५ पदे : शैक्षणिक पात्रता : (i) १० वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन १२० शब्द प्रति मिनिट (iii) मराठी टंकलेखन ३० शब्द प्रतिमिनिट. किंवा इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रतिमिनिट
लघुटंकलेखक १६ पदे : शैक्षणिक पात्रता : (i) १० वी उत्तीर्ण, लघुलेखन ८० शब्द प्रति मिनिट (iii) मराठी टंकलेखन ३० शब्द प्रतिमिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रतिमिनिट
जवान राज्य उत्पादन शुल्क ३७१ : शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क ७० : शैक्षणिक पात्रता : (i) ७ वी उत्तीर्ण (ii) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना
शिपाई ५० : शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण, वयाची अट : १३ जून २०२३ रोजी १८ ते ४० वर्षे (मागासवर्गीय : ५ वर्षे सूट)
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ जून २०२३
- अधिकृत संकेतस्थळ : stateexcise.maharashtra.gov.in
लघुलेखक व लघुटंकलेखक राज्य उत्पादन शुल्क भरती २०२३
लघुलेखक व लघुटंकलेखक पदाची पहिली ऑनलाइन लेखी परीक्षा व त्यानंतर १:१० या प्रमाणात शारीरिक / मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. जवान आणि जवान-नि-चालक पदाची परीक्षा एकूण १२० गुणांची होणार असून यात बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी व इंग्रजी या विषयावर प्रत्येकी ३० प्रश्न (प्रत्येक प्रश्न १ गुणांसाठी) विचारल्या जाणार आहेत. लघुलेखक व लघुटंकलेखक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खाली दिले आहे. यानंतर १:१० प्रमाणात उमेदवारांची ८० गुणांची लघुलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल. - प्रा. राजेंद्र चिंचाेले, (स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शक)