RBI मध्ये अधिकारी पदांसाठी भरती, पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर असा करा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 03:41 PM2022-05-25T15:41:05+5:302022-05-25T15:41:53+5:30
RBI Recruitment 2022: या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 24 मे 2022 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जून 2022 आहे.
नवी दिल्ली : तरुणांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ग्रेड ए पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार आरबीआयच्या अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर जाऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 24 मे 2022 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जून 2022 आहे. तसेच, ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जून निश्चित करण्यात आली आहे. आरबीआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 3 पदांसाठी जागा आहे. त्यानुसार आरबीआयमध्ये क्युरेटरचे 1 पद, आर्किटेक्टचे 1 पद आणि फायर ऑफिसरच्या एका पदासाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
शैक्षणिक पात्रता
क्युरेटर पदांच्या भरतीसाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून किमान 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. तर फायर ऑफिसरसाठी संबंधित विषयातील B.E/B.Tech ची पदवी असावी.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार 21 ते 32 वर्षे वयोगटातील असावेत आणि अधिक तपशीलवार माहितीसाठी अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
किती भरावे लागेल अर्जाचे शुल्क?
या पदांसाठी अर्ज करणार्या सामान्य, इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना 600 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल. सरकारी नियमांनुसार एससी/एसटी/दिव्यांग उमेदवारांना 100 रुपये भरावे लागतील. उमेदवारांना सूचित केले जाते की, त्यांनी पहिल्यांदा अधिकृत वेबसाइटला भेट देऊन संपूर्ण तपशील ऑनलाइन तपासा जेणेकरून उमेदवारांना अर्ज करताना कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये.