RRB Recruitment 2022: Prepp.in सह तयार करा स्व-तयारीचा प्रभावी आराखडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 06:04 PM2022-02-23T18:04:53+5:302022-02-23T18:07:05+5:30

RRB Recruitment 2022: भारतीय रेल्वेच्या विविध परीक्षांची तयारी तुम्ही Prepp सह अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकता.

rrb recruitment 2022 build an effective self preparation strategy with prepp in | RRB Recruitment 2022: Prepp.in सह तयार करा स्व-तयारीचा प्रभावी आराखडा

RRB Recruitment 2022: Prepp.in सह तयार करा स्व-तयारीचा प्रभावी आराखडा

Next

रेल्वेचे प्रचंड जाळे देशभरात पसरलेले असून, भारतीय रेल्वे दरवर्षी आपल्या विविध विभागांमध्ये उमेदवारांना अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत असते. सहाय्यक लोको पायलट, कनिष्ठ अभियंता, मदतनीस, तांत्रिक सहाय्यक यांसारख्या विविध पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी RRB JE, RRB ALP, RRB गट D आणि RRB NTPC सारख्या अनेक परीक्षांचे आयोजन करते. RRB Recruitment 2022 परीक्षा चार गटांमध्ये वर्गीकृत केल्या आहेत - गट अ, गट ब, गट क आणि गट ड. भारतीय रेल्वेच्या विविध पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा १८ ते ३३ वर्षे आहे. RRB Recruitment 2022 साठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता अर्ज केलेल्या पदाच्या आधारावर वेगवेगळी आहे. 

भारतीय रेल मंत्रालयाने (रेल्वे बोर्ड) RRB चे कार्य सुव्यवस्थित करणे, समन्वय साधणे आणि रोजगारावर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वे भरती नियंत्रण मंडळ (RRCB) स्थापन केले आहे. जवळपास दरवर्षी रेल्वे बोर्ड भारतीय रेल्वेमधील भरतीसाठी सर्वांत पात्र आणि योग्य उमेदवारांच्या नियुक्तीसाठी विविध परीक्षा घेत असते. तुम्हीदेखील RRB exams 2022 देण्याची योजना आखत असाल, तर Prepp तयारी करण्यास उत्तमरित्या मदत करू शकते. येथे काही सर्वांधिक लोकप्रिय RRB exams विषयी माहिती देण्यात येत आहे, ज्याची तयारी तुम्ही Prepp सह अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकता.

RRB JE 2022

भारतीय रेल्वेतील कनिष्ठ अभियंत्यांच्या नियुक्तीसाठी RRB JE Exam घेतली जाते. दरवर्षी, कनिष्ठ अभियंता, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट, केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टन्स, चीफ डेपो मटेरियल सुपरिटेंडंट आणि सीनियर सेक्शन इंजिनीअर या पदांसाठी सर्वांत योग्य उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी रेल्वे भरती बोर्डाद्वारे RRB JE Exam घेतली जाते. RRB JE CBT I परीक्षा २२ मे २०२२ रोजी होणे अपेक्षित आहे. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. या उमेदवाराकडे तीन वर्षांचा अभियांत्रिकीचा डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे गरजेचे आहे. तसेच, अर्ज करण्यासाठी किमान आणि कमाल वयोमर्यादा १८ ते २५ आहे. RRB JE परीक्षेत तांत्रिक योग्यता, अंकगणित, सामान्य जागरूकता, सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कावर आधारित १५० MCQ प्रश्न विचारले जातात.

रेल्वेच्या संबंधित विभागातील कनिष्ठ अभियंत्याचे वेतन रु. २९००० ते ३४५०० ग्रेड पे सह रु. ४२०० या दरम्यान असू शकते. प्रशिक्षण कालावधीत भरती करणार्‍यांना फक्त मूळ वेतन आणि डीए मिळू शकतो. उमेदवारांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर दर महिन्याला ४२००० रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. 

RRB NTPC Exam 2022

RRB NTPC Exam 2022 ही कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, ज्युनियर टाइम कीपर आणि ट्रेन क्लर्क या परीक्षा उमेदवारांनी दिलेल्या सर्वांत लोकप्रिय परीक्षांपैकी एक आहे. RRB NTPC 2022 साठी एकूण १०६०२ रिक्त जागा खुल्या करण्यात आल्या आहेत. RRB NTPC CBT-2 परीक्षा १५ ते १९ फेब्रुवारी 2022 या कालावधीत होणार होती. परंतु, पुढील सूचना मिळेपर्यंत सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. RRB NTPC साठी किमान शैक्षणिक पात्रता कोणत्याही विभागात किमान ५० टक्के गुणांसह १०+२ आहे. ही एक संगणक-आधारित चाचणी आहे, जी दोन टप्प्यांत घेतली जाते. ते म्हणजे प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षा. प्रिलिम्समध्ये सामान्य विज्ञान, अंकगणित क्षमता, सामान्य जागरूकता आणि तर्कावर आधारित प्रश्न असतात. RRB NTPC मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवाराचे मूळ वेतन सुरुवातीच्या वर्षांमध्ये सुमारे ३५,४००० रुपये प्रति महिना आहे.

RRB ALP Exam 2022

RRB ALP Exam 2022 परीक्षा सहाय्यक लोको पायलट आणि तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/अभियांत्रिकी इ.) या पदांच्या नियुक्तीसाठी घेतली जाते. RRB ALP 2022 ची अधिकृत अधिसूचना अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. तरी मार्च 2022 मध्ये यासंदर्भातील अधिसूचना निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सदर परीक्षा देण्यासाठी किमान पात्रता निकष १०वी + ITI अप्रेंटिसशिप किंवा १०+२ भौतिकशास्त्र आणि गणितासह किमान ५० टक्के आहे. RRB ALP Exam साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना CBT आणि संगणक-आधारित अभियोग्यता चाचणी (केवळ ALP साठी CBAT) द्यावी लागेल. उमेदवारांना जे विषय तयार करायचे आहेत, त्यात सामान्य विज्ञान, तर्क, गणित आणि सामान्य ज्ञान/चालू घडामोडी अशा विषयांचा समावेश आहे. RRB ALP मध्ये निवडलेल्या उमेदवारांना मिळणारा पगार अंदाजे ३५,००० रुपये प्रति महिना आहे.

Railway Protection Force Sub Inspector (RPF SI)

RPF SI Exam रेल्वे प्रोटेक्शन फोर्स बोर्डाद्वारे घेतली जाते. ही परीक्षा कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी घेतली जाते. सदर परीक्षा उमेदवारांची सामान्य बुद्धिमत्ता आणि तार्किकता, संख्यात्मक योग्यता, सामान्य ज्ञान आणि सामान्य इंग्रजी कौशल्ये तपासण्यासाठी घेतली जाते. परीक्षेचा कालावधी ३ तासांचा असून, २०० वस्तुनिष्ठ प्रश्न (Objective Type) विचारले जातील.

भारतीय रेल्वेत एका कॉन्स्टेबलचा पगार प्रतिमहिना २१००० रुपये, तर एका उपनिरीक्षकासाठी ३५००० रुपये प्रतिमहिना असू शकतो. कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनेक अतिरिक्त भत्त्यांमध्ये भविष्य निर्वाह निधी, निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा, शिक्षण सहाय्य, प्रवास, हस्तांतरण भत्ता इत्यादींचा समावेश होतो.

RRB Group D Exam

ट्रॅक मेंटेनर ग्रेड IV, असिस्टंट पॉइंट्समन, हेल्पर/सिस्टंट, लेव्हल I पदांसाठी अर्ज करून भारतीय रेल्वेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना RRB Group D Exam द्यावी लागेल. RRB ग्रुप डी परीक्षा २३ फेब्रुवारी २०२२ पासून अनेक टप्प्यांत होणार आहे. एकूण १०३७६९ रिक्त जागा भरण्यासाठी ही परीक्षा घेतली जाईल. परीक्षा देण्यासाठी पात्रता निकष कोणत्याही विभागात १०+२ आहे. RRB गट डी परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय फिटनेस चाचणी या चार टप्प्यांत घेतली जाते. परीक्षेचा कालावधी ९० मिनिटे असतो. परीक्षेत विचारले जाणारे विषय गणित, सामान्य विज्ञान, चालू घडामोडींची सामान्य जाणीव, सामान्य बुद्धिमत्ता आणि तार्किकता यांचा समावेश होतो.

RRB गट D पगार उमेदवारांनी अर्ज केलेल्या पदांनुसार वेगवेगळा असतो. विविध पदांसाठी २०,००० ते २५,००० या दरम्यान प्रतिमहिना पगार दिला जाऊ शकतो. आकर्षक पगाराव्यतिरिक्त उमेदवारांना दैनिक भत्ता, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, वाहतूक भत्ता, ओव्हरटाइम भत्ता, यासह अनेक भत्ते मिळतात.

RRB Recruitment 2022 Selection Process 

RRB Recruitment 2022 ची भरती प्रक्रिया तीन टप्प्यांत राबवली जाते. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे. उमेदवार अर्ज करण्यासाठी Railway Recruitment Board (RRB) अधिकृत संकेतस्थळांचा संदर्भ घेऊ शकतात. RRB Recruitment भरती प्रक्रियेचे तीन टप्पे पुढीलप्रमाणे...

● पहिला टप्पा: पहिला टप्पा संगणक आधारित चाचणी (CBT)

● टप्पा II: दुसरा टप्पा संगणक आधारित चाचणी (CBT)

● तिसरा टप्पा: टायपिंग कौशल्य चाचणी (TST)

या भरती प्रक्रियेतून निवडलेले उमेदवार नियुक्ती पत्र मिळण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी आणि कागदपत्र पडताळणी प्रक्रियेतून जातील.

RRB परीक्षेच्या तयारीत Prepp कशाप्रकारे मदत करते?

रेल्वे परीक्षांच्या तयारीसाठी उमेदवारांनी आपली तयारी अतिशय उत्तमरित्या, प्रभावीपणे करणे आवश्यक आहे. एवढेच नव्हे, तर त्याचे अनुसरण करणे गरजेचे आहे. तसेच, उमेदवारांनी तयारी सुरू करण्यापूर्वी परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रमाची माहिती असणे अतिशय महत्त्वाचे आहे. Prepp.in उमेदवारांना सर्व माहिती आणि तयारी संसाधने मिळू शकणारे एक-स्टॉप सोल्यूशन बनून इच्छुकांना त्यांची तयारी करण्यात मदत करते. उमेदवार Prepp चा फायदा घेऊ शकतात. पाहूया...

● उमेदवार Prepp वर विविध Railway Exams साठी तयारीची नमुने शोधू शकतात आणि त्यांचा संदर्भ देऊन ते स्वतःची उत्तम तयारी करू शकतात.

● Prepp उमेदवारांना सराव करण्यासाठी नमुना पेपर विनामूल्य प्रदान करते.

● Prepp वर, उमेदवार मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका शोधू शकतात. मागील वर्षीचे पेपर सोडवल्याने इच्छुक उमेदवारांना परीक्षेचा पॅटर्न चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होऊ शकते.

● इच्छुक उमेदवार Prepp वरील तयारीच्या टिप्स देखील पाहू शकतात.

● उमेदवार Prepp वर अधिसूचना, अर्ज, प्रवेशपत्र, परीक्षेच्या तारखा इत्यांदीसंबंधी अद्ययावत माहिती आणि लेटेस्ट नोटिफिकेशन्स मिळवू शकतात आणि स्वतःला अपडेट ठेवू शकतात.

भारतीय रेल्वे ही जागतिक स्तरावर विविध पदांसाठी दरवर्षी हजारो रिक्त पदांची घोषणा करणाऱ्या सर्वांत मोठ्या नियोक्त्यांपैकी एक आहे. अन्य विविध सरकारी नोकऱ्यांप्रमाणे, भारतीय रेल्वे विभागही ७ व्या CPC मॅट्रिक्सचे अनुसरण करतो आणि आकर्षक पगार बोनस ऑफर करतो. यमुळे १२वी नंतर रेल्वेच्या नोकऱ्या सर्वांत इष्ट पर्याय बनतात. योग्य पगारासह, रेल्वे कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), रात्रीच्या ड्युटीसाठी भत्ता, दैनिक भत्ता, वाहतूक भत्ता, ओव्हरटाइम भत्ता आणि बरेच काही यासह विविध प्रकारचे भत्ते मिळतात.

भारतीय रेल्वेकडून घेतल्या जाणाऱ्या या परीक्षांची स्पर्धात्मक पातळी अत्युच्य असल्याने या परीक्षांची पूर्ण तयारी करणे आणि रेल्वेमधील नोकरीचा विचार करणे महत्त्वाचे आहे. भारतीय रेल्वे विभागात उपलब्ध असलेल्या जास्तीत जास्त नोकऱ्यांच्या संधी मिळवण्यासाठी, भारतीय रेल्वेमध्ये उत्तम करिअर करण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू करा.

Web Title: rrb recruitment 2022 build an effective self preparation strategy with prepp in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.