ट्रेड अप्रेंटिसच्या 113 पदांसाठी भरती; दहावी उत्तीर्णही करू शकतात अर्ज, जाणून घ्या सविस्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 04:30 PM2022-08-02T16:30:47+5:302022-08-02T16:31:31+5:30
RRCAT Trade Apprentice Recruitment 2022 : उमेदवार RRCAT Apprentice Recruitment 2022 साठी अधिकृत वेबसाइटवर 17 ऑगस्ट 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
नवी दिल्ली : राजा रामण्णा सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीने (RRCAT) अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. उमेदवार RRCAT Apprentice Recruitment 2022 साठी अधिकृत वेबसाइटवर 17 ऑगस्ट 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 18 जुलै 2022 पासून सुरू करण्यात आली होती.
या पदांसाठी भरती
अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे वेल्डर, फिटर, मशिनिस्ट, टर्नर, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, सर्वेयर, कारपेंटर, सेक्रेटेरिअल असिस्टेंड, डेटा एंट्री ऑपरेटर आणि पंप ऑपरेटर यासह ट्रेड अप्रेंटिसच्या 113 रिक्त पदांची भरती केली जाईल. या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना 11600 रुपये मानधन दिले जाईल.
कोण करू शकतं अर्ज?
ट्रेड अप्रेंटिसच्या पदांसाठी भरतीसाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित क्षेत्रातील आयटीआय पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याशिवाय, किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 22 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. सविस्तर माहितीसाठी तुम्ही अधिकृत अधिसूचना तपासू शकता.
उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतील
ट्रेड अप्रेंटिस भरतीसाठी निवड 10 वी आणि ITI आणि वैद्यकीय परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. 7 सप्टेंबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी अपलोड केली जाईल. तर, वैद्यकीय परीक्षा 7 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर 2022 या कालावधीत घेतली जाईल. उमेदवार 17 ऑगस्ट 2022 पर्यंत अधिकृत वेबसाइट apprenticeshipindia.org वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.