Sarkari Naukri Bank Recruitment : पदवीधरांसाठी बँकेत 'या' बँकेत नोकरीची संधी, ७० हजारांपंर्यंत पगार; पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 02:05 PM2022-08-06T14:05:18+5:302022-08-06T14:05:47+5:30

PNB Recruitment 2022, Bank Jobs: इच्छुक उमेदवारांना यासाठी ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. पाहा संपूर्ण डिटेल्स.

sarkari job pnb recruitment 2022 bank job 103 vacancies check eligibility selection process and salary details sarkari naukri | Sarkari Naukri Bank Recruitment : पदवीधरांसाठी बँकेत 'या' बँकेत नोकरीची संधी, ७० हजारांपंर्यंत पगार; पाहा डिटेल्स

Sarkari Naukri Bank Recruitment : पदवीधरांसाठी बँकेत 'या' बँकेत नोकरीची संधी, ७० हजारांपंर्यंत पगार; पाहा डिटेल्स

Next

PNB Recruitment 2022, Sarkari Naukri 2022: पंजाब नॅशनल बँकेतनोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. पीएनबीमध्ये ऑफिसर आणि मॅनेजर पदाच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. १०० पेक्षा अधिक जागांवर उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवारांना पीएनबीच्या pnbindia.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

इच्छुक उमेदवारांना या पदासाठी ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन पद्धतीनं तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्यापूर्वी आवश्यक डिटेल्स आणि निवड प्रक्रिया याबाबत तुम्ही माहिती घेऊ शकता. तसंच पीएनबीच्या संकेतस्थळावरही तुम्हाला यासंदर्भातील माहिती मिळू शकते.

 

किती पदे?

ऑफिसर (फायर सेफ्टी) - २३ पदे

मॅनेजर (सिक्युरिटी) - ८० पदे

एकूण पदांची संख्या -१०३

कोण करू शकतं अर्ज?

  • ऑफिसर (फायर सेफ्टी) साठी नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूरमधून बीई केलेलं असणं अनिवार्य आहे किंवा फायर टेक्नॉलॉजी अथवा सेफ्टी अँड फायर इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर्स डिग्री असणं अनिवार्य आहे. याशिवाय एक वर्षाचा अनुभवही आवश्यक आहे.
  • मॅनेजर (सिक्युरिटी) - मान्यताप्राप्त कॉलेजमधून कोणत्याही विषयात डिग्री असणं आवश्यक आहे. याशिवाय आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये ५ वर्षांचा अनुभव किंवा पोलीस खात्यात डिप्टी सुप्रिटेंडंट अथवा असिस्टंट कमाडंट म्हणून ५ वर्षांची सेवा असावी.
  • या पदांसाठी किमान वयोमर्यादा २१ वर्षे आणि कमला वयोमर्यादा ३५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
     

किती असेल वेतन?

ऑफिसर पदावर नोकरी मिळवणाऱ्या उमेदवाराला ३६०००-१४९०/७-४६४३०-१७४०/२-४९९१०-१९९०/७-६३८४० रूपये आणि मॅनेजर पदासाठी ४८१७०-१७४०/१-४९९१०-१९९०/१०-६९८१० रुपये वेतन दिलं जाईल. उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. अन्य उमेदवारांसाठी १००३ रूपये शुल्क भरावं लागणार आहे. तर अनुसुचित जाती, जमाती, पीडब्ल्यूडी श्रेणीतील उमेदवारांना ५९ रुपये शुल्क भरावं लागेल.

माहिती पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

Web Title: sarkari job pnb recruitment 2022 bank job 103 vacancies check eligibility selection process and salary details sarkari naukri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.