Bank of Indiaमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; आजपासून ऑनलाइन अर्जाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 09:17 AM2020-09-16T09:17:07+5:302020-09-16T09:17:21+5:30
या पदांवर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी स्वतंत्रपणे निश्चित केली जाणार आहे.
बँक ऑफ इंडियाने 214 अधिकारी पदांसाठी अर्ज मागविलेले आहेत. याअंतर्गत इकॉनॉमिस्ट, स्टेटिस्टिशियन, रिस्क मॅनेजर, क्रेडिट ऑफिसर यांच्यासह इतरही पदेही भरण्यात येणार आहेत. या पदांवर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी स्वतंत्रपणे निश्चित केली जाणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत सूचना एकदा वाचणे आवश्यक आहे, जी खाली दिलेली आहे. त्याचबरोबर या पदांवरील सर्व उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवार बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
शैक्षणिक पात्रताः इकॉनॉमिस्ट (स्केल IV)च्या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्थशास्त्र/इकोनॉमेट्रिक्समध्ये पीएचडी पदवी किंवा 5 वर्षांत विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. पदांनुसार शैक्षणिक पात्रता सविस्तरपणे दिली आहे.
खालीलप्रमाणे पदे पोस्टच्या अनुसार वेगळ्या पद्धतीने निश्चित केली जातात-
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज प्रारंभ तारीख: 16 सप्टेंबर 2020
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 सप्टेंबर 2020
अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2020
एससी, एसटी, पीडब्ल्यूडी प्रवर्गात 175 रुपये जमा करावे लागतील. याशिवाय सर्वसाधारण आणि इतर प्रवर्गातील लोकांना 850 रुपये जमा करावे लागतील. अर्ज फी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगद्वारे भरता येईल.
अर्ज प्रक्रिया: वरील पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार संबंधित वेबसाइट www.bankofindia.co.in/ Career वर जाऊन दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करतात. निवडलेल्या उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी/किंवा जीडी/वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाईल.