Sarkari Naukri 2022: BSF मध्ये १२ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीची संधी ९० हजारांपेक्षा अधिक वेतन; कसा कराल अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 02:08 PM2022-08-09T14:08:40+5:302022-08-09T14:09:11+5:30
Sarkari Naukri 2022: बीएसएफमध्ये निरनिराळ्या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना ६ सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचं आवाहन.
BSF Head Constable Ministerial & ASI Stenographer Recruitment 2022: सरकारी नोकरीच्या संधी शोधत असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची चांगली संधी आहे. सीमा सुरक्षा दलाने (BSF) हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरिअल) आणि एएसआय (स्टेनोग्राफर) या पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार rectt.bsf.gov.in वर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी ८ ऑगस्टपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर उमेदवारांना या पदांसाठी उमेदवार ६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
सीमा सुरक्षा दलाने हेड कॉन्स्टेबल पदासाठी 312 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. त्याचबरोबर ASI (स्टेनोग्राफर) पदासाठी 11 जागांवर भरती करण्यात येणार आहे. हेड कॉन्स्टेबलसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असावा. तर, ASI (स्टेनो) पदांसाठी, उमेदवारांनी 12वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि लघुलेखन/टायपिंग कौशल्य चाचणीत प्रवीण असावे.
शुल्क आणि वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. तर एससी, एसटी, माजी कर्मचाऱ्यांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही. यासाठी वयोमर्यादा 18 ते 25 इतकी निश्चित करण्यात आली आहे.
किती असेल वेतन?
हेड कॉन्स्टेबलसाठी पे लेव्हल 4 नुसार 81100 रुपये प्रति महिना वेतन निश्चित करण्यात आलं आहे. तर एएसआयसाठी पे लेव्हल 5 नुसार 29200-92300 रूपये प्रति महिना वेतन देण्यात येईल. दरम्यान, उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, स्किल टेस्ट, फिजिकल टेस्ट, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि मेडिकलनंतर केली जाईल.
अधिक माहिती साठी इथे क्लिक करा