Sarkari Naukri 2022 : संरक्षण मंत्रालयात ऑफिसर, ट्रान्सलेटर पदांवर नोकरीची सुवर्णसंधी; ३९ हजारांपर्यंत मिळणार वेतन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 11:50 AM2021-12-05T11:50:16+5:302021-12-05T11:50:16+5:30
Sarkari Naukri 2022 : निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार ३९ हजारांपर्यंत वेतन देण्यात येणार आहे.
Sarkari Naukri Ministry Of Defence Recruitment 2022 : डायरेक्टर जनरल डिफेन्स इस्टेट (DGDE), मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनं आपल्या अधिकृत वेबसाईटवर dgde.gov.in वर एक नोटिफिकेशन जारी केलं आहे. यानुसार ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर, हिंदी टायपिस्ट आणि सब डिव्हिजनल ऑफिसरची अनेक पदं रिक्त आहेत. दरम्यान, इच्छुक उमेदवारांना या पदांसाठी १५ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
अधिकृत नोटिफिकेशननुसार ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी ७, सब डिव्हिजनल ऑफिसर पदांसाठी ८९ आणि हिंदी टायपिस्ट या पदासाठी ८९ पदे रिक्त आहेत. ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं किंमान वय १८ आणि कमाल वय ३० असणं आवश्यक आहे. सब डिव्हिजनल ऑफिसर आणि हिंदी टायपिस्ट या पदासाठी उमेदवाराचं वय १८ ते २७ वर्षांदरम्यान निश्चित करण्यात आलंय. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सूट दिली जाईल.
ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर पदावर नियुक्ती होणाऱ्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार ९३०० रुपये त ३४८०० + ४२०० रूपये ग्रेड पे असं वेतन दिलं जाईल. तर सब डिव्हिजनल ऑफिसर पदासाठी नियुक्ती होणाऱ्या उमेदवारांना ५२०० ते २०२०० + २४०० रुपयांपर्यंत वेतन दिलं जाईल. अधिक माहितीसाठी याठिकाणी क्लिक करा.