10 वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी! 12828 पदांसाठी भरती, घरबसल्या करू शकता अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 04:54 PM2023-05-22T16:54:28+5:302023-05-22T16:54:57+5:30

उमेदवार विहित अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी विभागाच्या अधिकृत वेबसाइट, indiapostgdsonline.gov.in द्वारे अर्ज सबमिट करू शकतात.

sarkari naukri 2023 gds recruitment 2023 notification pdf apply at india post gds online gov in  | 10 वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी! 12828 पदांसाठी भरती, घरबसल्या करू शकता अर्ज

10 वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी! 12828 पदांसाठी भरती, घरबसल्या करू शकता अर्ज

googlenewsNext

नवी दिल्ली :  भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज, 22 मे 2023 पासून सुरू झाली असून 11 जून 2023 पर्यंत असणार आहे. उमेदवार विहित अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी विभागाच्या अधिकृत वेबसाइट, indiapostgdsonline.gov.in द्वारे अर्ज सबमिट करू शकतात.

दरम्यान, भारतीय टपाल विभागाने एकूण 12828 रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि राजस्थानसह विविध राज्यांमध्ये भरती केली जाणार आहे. पदांच्या संख्येशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार विभागाने जारी केलेली अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.

शैक्षणिक पात्रता
ग्रामीण डाक सेवक पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराला संगणक आणि स्थानिक भाषेचेही ज्ञान असले पाहिजे.

कोण करू शकतं अर्ज?
या पदासाठी 18 वर्षे ते 40 वयोगटातील तरुण अर्ज करू शकतात.  एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 5 वर्षे आणि ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे. वयाच्या शिथिलतेबद्दल अधिक माहितीसाठी, उमेदवार जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.

अर्जाचे शुल्क किती भरावे लागेल?
सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तसेच, एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

कशी होईल निवड?
निवडलेल्या उमेदवारांची निवड गुणवत्तेद्वारे केली जाईल. उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे गुणवत्ता तयार केली जाईल.

कसा करावा अर्ज?
- अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in वर जा.
- होम पेजवर दिलेल्या नोंदणीसाठी लिंकवर क्लिक करा.
- आवश्यक माहिती प्रविष्ट करून नोंदणी करा.
- मागितेली कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज फी भरा आणि सबमिट करा.

Web Title: sarkari naukri 2023 gds recruitment 2023 notification pdf apply at india post gds online gov in 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी