Sarkari Naukri 2023 :सुवर्ण संधी! ITBP मध्ये परीक्षेशिवाय नोकरी मिळवा, मिळणार ६९,००० पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 12:21 PM2023-02-21T12:21:42+5:302023-02-21T12:31:26+5:30
sarkari naukri 2023: इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्समध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ITBP ने कॉन्स्टेबल/जनरल ड्युटी (स्पोर्ट्सपर्सन) च्या पदांसाठी भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत.
ITBP Recruitment 2023: इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्समध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ITBP ने कॉन्स्टेबल/जनरल ड्युटी (स्पोर्ट्सपर्सन) च्या पदांसाठी भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ITBP recruitment.itbpolice.nic.in च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतील. या पदांसाठी (ITBP Recruitment 2023) उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया २० फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. (sarkari naukri 2023)
इच्छुक उमेदवार या जागेसाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. https://www.itbpolice.nic.in/ या लिंकवर थेट अर्ज करू शकतात. तसेच, https://recruitment.itbpolice.nic.in/ या लिंकवर क्लिक करून, तुम्ही या पदांशी संबंधित अधिकृत अधिसूचना तपासू शकता . ITBP भर्ती २०२३ अंतर्गत एकूण ७१ पदे भरली जाणार आहेत.
कष्टाचं फळ! सरकारी शाळेत शिक्षण, शेतात केलं काम; जुळ्या मुलांची आई झाली IPS अधिकारी
७१ जागांसाठी भरती
कॉन्स्टेबल/जनरल ड्युटी (खेळाडू) च्या ७१ रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती आयोजित केली आहे.
वयोमर्यादा
ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांचे वय २१ मार्च २०२३ रोजी १८ ते २३ वर्षांच्या दरम्यान असावे.
ITBP भारतीसाठी अर्जाची सुरुवातीची तारीख – २० फेब्रुवारी होणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख - २१ मार्च २०२३ आहे.
पात्रता
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क
UR/OBC/EWS श्रेणीतील पुरुष उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १०० रुपये भरावे लागतील. SC/ST आणि महिला उमेदवारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. (sarkari naukri 2023)
पगार
या पदांसाठी जे उमेदवार निवडले जातील, त्यांना २१,७०० ते ६९,१०० रुपये वेतन दिले जाईल.