JOB Alert : अरे व्वा! Indian Oil Corporation मध्ये नोकरीची मोठी संधी; 480 जागांसाठी होणार भरती, आजच करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 12:24 PM2021-08-24T12:24:56+5:302021-08-24T12:28:56+5:30

IOCL Recruitment 2021 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये अनेक पदांवर भरती आहे. तब्बल 480 पदांसाठी भरती होणार असून नोटीफिकेशन जारी करण्यात आली आहे.

sarkari naukri iocl recruitment 2021 trade technician apprentice job vacancy apply last date 28 august | JOB Alert : अरे व्वा! Indian Oil Corporation मध्ये नोकरीची मोठी संधी; 480 जागांसाठी होणार भरती, आजच करा अर्ज

JOB Alert : अरे व्वा! Indian Oil Corporation मध्ये नोकरीची मोठी संधी; 480 जागांसाठी होणार भरती, आजच करा अर्ज

googlenewsNext

नवी दिल्ली - इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited -IOCL)मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये अनेक पदांवर भरती आहे. तब्बल 480 पदांसाठी भरती होणार असून नोटीफिकेशन जारी करण्यात आली आहे. टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अप्रेंटिस या पदासाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 असणार आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडची अधिकृत वेबसाईट iocl.com वर जाऊन इच्छूक उमेदवार अर्ज करू शकतात.  

जागा

टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अप्रेंटिस - 480

शैक्षणिक पात्रता

टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अप्रेंटिससाठी बारावी आणि कोणत्याही क्षेत्रात ITI उत्तीर्ण असणं आवश्यक.

वयोमर्यादा

18 ते 24 वर्षे

महत्त्वाच्या तारखा 

अर्ज पाठवण्याची सुरुवातीची तारीख - 13 ऑगस्ट 2021

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 28 ऑगस्ट 2021

परीक्षेची तारीख - 19 सप्टेंबर

असा करा अर्ज 

अर्ज करण्यासाठी iocl.com वर जा. यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. उमेदवारांची लेखी परीक्षा आणि मुलाखतीतून निवड केली जाणार आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नोटिफिकेशन पाहू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: sarkari naukri iocl recruitment 2021 trade technician apprentice job vacancy apply last date 28 august

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.