JOB Alert : गुड न्यूज! पॉवरग्रीड कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 1110 पदांवर भरती, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 03:39 PM2021-07-20T15:39:00+5:302021-07-20T15:45:52+5:30
PGCIL Apprentice Recruitment 2021: पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे.
नवी दिल्ली - पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये (PGCIL Apprentice Recruitment 2021) नोकरीची सुवर्णसंधी आहे. तब्बल 1110 पदांवर अप्रेंटिस भरती निघाली आहे. अधिकृत माहितीनुसार, पॉवरग्रीड कॉर्पोरेशनच्या गुरुग्राम, फरीदाबाद, जम्मू, लखनऊ, पटना, कोलकाता, शिलाँग, भुवनेश्वर, नागपूर, वडोदरा, हैदराबाद आणि बंगळुरू येथे वेगवेगळ्या पदांवर एक वर्ष कालावधीसाठी ट्रेनी पोस्टसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र व इच्छुक उमेदवार powergrid.in वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज जमा करण्यास सुरुवात - 21 जुलै 2021
ऑनलाईन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख - 20 ऑगस्ट
JOB Alert : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; जाणून घ्या, कसा अन् कधी करायचा अर्ज?#SSCGDNotification2021#Jobs#JobAlerthttps://t.co/EYpl3te2yR
— Lokmat (@MiLOKMAT) July 17, 2021
पात्रता
- आयटीआय अप्रेंटिस इलेक्ट्रिकलसाठी उमदेवार इलेक्ट्रिकलमधील आयटीआय उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
- डिप्लोमा अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल आणि सिव्हील) साठी विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिकल आणि सिव्हील इंजिनिअरींगमधील डिप्लोमा असणं आवश्यक आहे.
- ग्रॅज्युएट अप्रेंटिस करण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचं बीई, बी.टेक आणि बीएसी इंजिनिअरींग झालेलं असेल ते इलेक्ट्रिकल, सिव्हील, इलेक्ट्रॉनिक्स, टेलीकम्युनिकेशन, कॉम्युटर सायन्समध्ये पदवीधर असणं आवश्यक आहे.
- HR एक्झ्युकेटीव्हसाठी मानव संसाधनातील एमबीए, एमएसडब्ल्यू, पर्सनल मॅनेजमेंट आणि पर्सनल मॅनेजमेंट दोन वर्षांचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम.
GAIL Recruitment 2021 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 'या' पदांसाठी होणार मोठी भरती#job#JobAlert#GAILRecruitment2021https://t.co/tOCTrYQzdP
— Lokmat (@MiLOKMAT) July 11, 2021
स्टायपेंड
आयटीआय अप्रेंटिस: 11 हजार
डिप्लोमा अप्रेंटिस: 12 हजार
ग्रॅज्युएट अप्रेंटिस : 15 हजार
HR एक्झ्युकेटीव्ह : 15 हजार
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड त्यांच्या संबंधित ट्रेडमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे होणार आहे. त्यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
IOCL Recruitment2021: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर, 'या' पदांसाठी होणार मोठी भरती#Jobs#JobAlert#IndianOil#IOCLRecruitment2021https://t.co/DSKfiAhC8g
— Lokmat (@MiLOKMAT) July 14, 2021