SBI Recruitment 2022-23 : SBI मध्ये विविध पदांसाठी भरती, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 07:39 PM2022-12-28T19:39:32+5:302022-12-28T19:40:11+5:30
SBI Recruitment 2022-23 : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2023 आहे.
नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया अधिकारी ते लिपिक पदापर्यंत भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2023 आहे.
याशिवाय, उमेदवार या पदांसाठी थेट https://recruitment.bank.sbi/crpd-2022-23-rs-29/apply या लिंकद्वारे अर्ज करू शकतात. तसेच, SBI Recruitment 2022 Notification PDF या लिंकवर क्लिक करून, तुम्ही अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 1438 पदे भरली जाणार आहेत. ही भरती सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी केली जात आहे.
भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुरू झालेली तारीख - 22 डिसेंबर
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जानेवारी
एकूण जागा किती?
एकूण पदांची संख्या- 1438
या पदांसाठी पात्रता
अधिकृत अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांकडे संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे.
वेतन किती मिळेल?
- लिपिक - 25000 रुपये
- जेएमजीएस-I- 35000 रुपये
- MMGS-II आणि MMGS-III – 40000 रुपये
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीवर आधारित असेल.