SBI Job Alert: स्टेट बँकेत नोकरीची संधी; फक्त मुलाखत घेतली जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 16:37 IST2022-04-20T16:36:29+5:302022-04-20T16:37:10+5:30
इच्छुक उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर sbi.co.in जाऊन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

SBI Job Alert: स्टेट बँकेत नोकरीची संधी; फक्त मुलाखत घेतली जाणार
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी चांगली बातमी आहे. स्टेट बँकेने भरती काढली आहे. यामध्ये विशेष अधिकाऱ्यांच्या जागा भरल्या जाणार आहेत. या जागांवर तुम्ही शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करू शकणार आहात.
इच्छुक उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर sbi.co.in जाऊन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. एसबीआय एससीओ भरती 2022 ची प्रक्रियेत निवड ही गुणपडताळणी आणि मुलाखतीवरून केली जाणार आहे.
अर्ज करताना तुम्हाला सामान्य,ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅटेगरीसाठी ७५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंगद्वारे भरू शकणार आहात. एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडीसाठी शुल्कमाफ आहे.
या जागा भरणार... Government Vacancy: SBI Specialist Cadre Officer Recruitment 2022
पद : वरिष्ठ कार्यकारी (अर्थशास्त्र)
रिक्त पदे : 02
पद : एडवाइजर (फ्रॉड रिस्क)
रिक्त पदे : 04
पद : मॅनेजर (परफॉर्मेंस प्लानिंग अँड रिव्यू)
रिक्त पदे : 02