SBI Recruitment 2022: एसबीआयमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, या पदांवर निघालीय बंपर भरती, अशा आहेत अटी शर्ती 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 05:57 PM2022-05-18T17:57:54+5:302022-05-18T17:58:35+5:30

SBI Recruitment 2022: भारतीय स्टेट बँकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. स्टेट बँकेने चॅनल मॅनेजर फेसिलिटेटर एनिटाईम चॅनल (सीएमएफ-एसी), चॅनल मॅनेजर सुपरवायजर  एनिटाईम चॅनल (सीएमएस-एसी) आमि सपोर्ट ऑफिसर-एनिटाईम चॅनल्स (एसओ-एसी) या पदांना भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत.

SBI Recruitment 2022: Golden Opportunity for Jobs in SBI, Bumper Recruitment for these Posts | SBI Recruitment 2022: एसबीआयमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, या पदांवर निघालीय बंपर भरती, अशा आहेत अटी शर्ती 

SBI Recruitment 2022: एसबीआयमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, या पदांवर निघालीय बंपर भरती, अशा आहेत अटी शर्ती 

Next

मुंबई - भारतीय स्टेट बँकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. स्टेट बँकेने चॅनल मॅनेजर फेसिलिटेटर एनिटाईम चॅनल (सीएमएफ-एसी), चॅनल मॅनेजर सुपरवायजर  एनिटाईम चॅनल (सीएमएस-एसी) आमि सपोर्ट ऑफिसर-एनिटाईम चॅनल्स (एसओ-एसी) या पदांना भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआयच्या sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी आज म्हणजेच १८ मेपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

त्याशिवाय उमेदवार थेट https://recruitment.bank.sbi/crpd-rs-2022-23-07/apply या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी अर्ज करू शकतात. तसेच https://sbi.co.in/documents/77530/25386736/17052022_Final या लिंकच्या माध्यमातून अधिकृत नोटिफिकेशन पाहू शकता. या भरतीप्रक्रियेंतर्गत एकूण ६४१ पदे भरली जातील. 

या भरतीप्रक्रियेमधील महत्त्वपूर्ण तारखा पुढीलप्रमाणे आहेत 
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात करण्याची तारीख - १८ मे २०२२
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - ७ जून २०२२

या भरती प्रक्रियेतून भरली जाणारी रिक्त पदे 
चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर एनिटाईम चॅनल (सीएमएफ-एसी) - ५०३ 
चॅनल मॅनेजर सुपरवायझर एनिटाइम चॅनल (सीओएमएस-एसी) - १३०
सपोर्ट ऑफिसर - एनिटाइम चॅनल्स (एसओ-एसी)- ८ 
या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांकडे अधिकृत नोटिफिकेशनमध्ये दिलेली संबंधित पात्रता असली पाहिजे. 

वेतनश्रेणी 
चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर एनिटाईम चॅनल (सीएमएफ-एसी) -३६ हजार दरमहा
चॅनल मॅनेजर सुपरवायझर एनिटाइम चॅनल (सीएमएस-एसी) - ४१ हजार रुपये दरमहा
सपोर्ट ऑफिसर - एनिटाईम चॅनल्स (एसओ-एसी) ४१ हजार रुपये दरमहा

वयोमर्यादा 
उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही ६० वर्षे असली पाहिजे

निवडप्रक्रिया 
शॉर्टलिस्टिंग
इंटरव्यू 
मेरिट लिस्ट 

Web Title: SBI Recruitment 2022: Golden Opportunity for Jobs in SBI, Bumper Recruitment for these Posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.