सरकारी बँकेत परीक्षेशिवाय नोकरी मिळण्याची संधी; 60 हजारपर्यंत मिळेल पगार!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 01:54 PM2023-06-16T13:54:04+5:302023-06-16T13:56:18+5:30
SBI Recruitment 2023: उमेदवारांकडून अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर अर्ज मागविण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : सरकारी बँकेत परीक्षेशिवाय नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी आहे. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) सेवानिवृत्त बँक अधिकारी पदांसाठी भरती काढली आहे. ज्यासाठी उमेदवारांकडून अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर अर्ज मागविण्यात आले आहेत.
एसबीआयने एकूण 194 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत, ज्यामध्ये काउंसलरची 182 पदे आणि डायरेक्टरच्या 12 पदांचा समावेश आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 15 जून 2023 पासून उमेदवार या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सबमिट करू शकतात. तसेच, अर्ज करण्यासाठी 6 जुलैपर्यंत संधी दिली जाणार आहे.
पात्रता
काउंसलर आणि डायरेक्टर म्हणून लोकांना वित्तीय संस्थांशी संबंधित मुद्द्यांवर काउंसलिंग कसे करावे, हे माहित असले पाहिजे. तसेच प्रादेशिक भाषेचे ज्ञान असावे. याशिवाय उमेदवारांचे वय 60 ते 63 वर्षे दरम्यान असावे.
निवड प्रक्रिया
प्राप्त झालेल्या अर्जांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. यानंतर निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखत एकूण 100 गुणांची असेल. त्यात मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
वेतन
निवडलेल्या उमेदवारांना 35,000 रुपये ते 60,000 रुपये प्रति महिना पगार दिला जाईल. भरतीशी संबंधित इतर माहितीसाठी आणि अधिसूचना पाहण्यासाठी पुढील लिंक पाहून शकता. https://sbi.co.in/documents/77530/36548767/150620231114-ADVT+FLC.pdf/bbab2e95-3c77-f822-58c1-83649ad02a64?t=1686809072151