Bank Job Alert: स्टेट बँकेला हवेत मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर; परीक्षेविना होणार मुलाखत, पगार लाखापर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 05:36 PM2022-05-26T17:36:56+5:302022-05-26T17:37:35+5:30
SBI SCO Recruitment 2022: स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशालिस्ट केडर ऑफिसरच्या पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जारी केले आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशालिस्ट केडर ऑफिसरच्या पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जारी केले आहे. या भरतीमध्ये एजीएम, मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजरची पदे भरली जाणार आहेत. इच्छूक उमेदवार १२ जूनपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.
21 मे 2022 पासून 32 पदांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. AGM पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह BE/B.Tech असणे आवश्यक आहे.
डेप्युटी मॅनेजर : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून स्टॅटिस्टिक्स पदवी असणे आवश्यक आहे. या भरतीअंतर्गत विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेतअधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन पहावे.
वयोमर्यादा
एजीएमसाठी वय (आयटी टेक ऑपरेशन्स, आयटी इनबाउंड इंजिनीअर, आयटी आउटबाउंड इंजिनीअर, आयटी सिक्युरिटी स्पेशलिस्ट) 45 वर्षे, मॅनेजर (आयटी सिक्युरिटी स्पेशलिस्ट) चे वय 38 वर्षे आणि डेप्युटी मॅनेजर (नेटवर्क इंजिनीअर, साइट इंजिनीअर कमांड सेंटर) वय 35 वर्षे असणे आवश्यक आहे.
एजीएम पदासाठी 89,890 ते 1,00,350 रुपये प्रति महिना वेतन दिले जाणार आहे. तर मॅनेजर पदासाठी, 63,840 ते 78,230 रुपये आणि डेप्युटी मॅनेजर पदासाठी 48,170 ते 69,810 रुपये वेतन दिले जाणार आहे.
SBI SCO Recruitment 2022 Application Form अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा...