SGPGI Recruitment 2022: PGI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; टेक्निकल ऑफिसरसह अनेक पदांवर भरती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 09:01 PM2022-01-26T21:01:00+5:302022-01-26T21:02:05+5:30
SGPGI Recruitment 2022: संजय गांधी पोस्टग्रॅज्युएट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी sgpgims.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
SGPGI Recruitment 2022: संजय गांधी पोस्टग्रॅज्युएट इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये (SGPGI) मेडिकल आणि नॉन मेडिकल पदांसाठी बंपर भरती निघाली आहे. या माध्यमातून मेडिकल फिजिसिस्ट, मेडिकल सोशल सर्व्हीस ऑफिसर आणि पर्सनल असिस्टंटसारख्या विविध पदांवर भरती केली जाणार आहे. एकूण १६५ रिक्त जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यामुळे सरकारीनोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी आहे. इच्छुकांना अर्ज दाखल करण्यासाठी SGIPGI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्म भरावा लागणार आहे. या पदांसाठीची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २५ जानेवारी २०२२ पासून सुरू झाली आहे.
एसजीपीजीआयमध्ये (Sanjay Gandhi Post Graduate Institute of Medical Science SPPGI) विविध पदांसाठी भरतीसाठी जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार अर्ज ऑनलाइन मोडनं नियोजित करण्यात आले आहेत. ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांना १४ फेब्रुवारी २०२२ पर्यंतचा कालावधी दिला आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याआधी वेबसाइटवर उपलब्ध नोटिफिकेशनची व्यवस्थित माहिती करुन घ्यावी. यासोबतच अर्जात कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. नाहीतर अर्ज नाकारला जाऊ शकतो.
अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया
१. अर्ज करण्यासाठी सर्वात आधी SGPGI च्या अधिकृत वेबसाइटवर sgpgims.org.in वर भेट द्या.
२. वेबसाइटच्या होमपेजवर उपलब्ध असलेल्या Recruitments/Admissions टॅबवर क्लिक करा
3. आता Apply Online: Application form submission against advertisement nos या लिंकवर क्लिक करा
४. रजिस्ट्रेशनसाठी मोबाइल क्रमांक किंवा इमेलचा वापर करावा.
५. प्राप्त झालेल्या पासवर्डच्या माध्यमातून लॉगइन करा
६. अर्जाचं शुल्क भरा
७. अखेरीस अर्जाची प्रत डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंटआऊट काढून ठेवा.
वॅकेन्सी डिटेल्स
SGPGI च्या नोटिफिकेशननुसार एकूण १६५ पदांसाठी भरती जारी केली आहे. यात मेडिकल फिजिसिस्टसाठी ३ जागा, ट्यूटर कॉलेज ऑफ नर्सिंगसाठी ८ जागा, टेक्लिकल ऑफिसरसाठी ३ जागा, मेडिकल सोशल सर्व्हिस ऑफिसरसाठी ११ जागा, असिस्टंट डाएटिशिअनसाठी ६ जागा, फिजिओथेरेपिस्टसाठी ११ जागा, फार्मासिस्ट ग्रेड-३ साठी १४ जागा, हाऊसकिपिंगसाठी ३ जागांवर भरती केली जाणार आहे.
यासोबतच रिसेप्शनिस्टसाठी १८ जागा, ज्युनिअर इंजिनिअर सिवील विभागासाठी ९ जागा आणि ज्युनिअर इंजिनिअर इलेक्ट्रिकलसाठी ४ जागांवर भरती केली जाणार आहे. ज्युनिअर इंजिनिअर मॅकेनिक विभागासाठी दोन जागा आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रूप-सीमध्ये १४ जागा भरल्या जाणार आहेत. तसेच पर्सनल असिस्टंटसाठी १० जागा, स्टेनोग्राफरसाठी २२ जागा आणि ड्रायव्हरसाठी १० जागांवर भरती केली जाणार आहे. भरती प्रक्रियेसाठीची संपूर्ण माहिती वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे.