सोशल मीडीयातल्या या 6 चूका तुमची नोकरी घालवू शकतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 04:56 PM2017-09-07T16:56:06+5:302017-09-07T16:56:51+5:30

आपल्याला वाटतं, आपलं अकाऊण्ट, आपला डेटा, मी काय वाट्टेल ते लिहिन, पण तसं कराल तर पस्तावाल!

six mistakes in social media could cost you the job | सोशल मीडीयातल्या या 6 चूका तुमची नोकरी घालवू शकतात!

सोशल मीडीयातल्या या 6 चूका तुमची नोकरी घालवू शकतात!

Next
ठळक मुद्देनोकरी मिळणं आणि नोकरी टिकणं याच्याशी सोशल मीडीयाचा संबंध आहे, हे विसरु नका.

-नितांत महाजन

आपला फोन, आपलं सोशल सोशल मीडीया अकाऊण्ट, आपण काय वाट्टेल ते लिहू, या देशात काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही असं बाणेदारपणे म्हणालही तुम्ही, पण ते म्हणताना हे लक्षात ठेवा की आपल्याला पोट आहे, आणि त्यासाठी नोकरी करावी लागते. सोशल मीडीयातला आपला उल्लूपणा आपली नोकरी घालवू शकतो किंवा आपल्याला नोकरीच मिळू नये अशी व्यवस्थाही करू शकतो. कुणालाही नोकरी देण्यापूर्वी त्या व्यक्तीचा सोशल मीडीया प्रेझेन्स तर आताशा तपासला जातोच, पण बहुतांश रिक्रुटमेण्टही सोशल मीडीयातून होत असल्याचं सध्या चित्र आहे. त्यामुळे सोशल मीडीयात व्यक्त होताना हे लक्षात ठेवा की, आपली मतं वागणं वेगळं आणि उल्लूपणा, आततायीपणा, अश्लिल वर्तन आपल्या नोकरीच्या मुळावर उठू शकतं.
ते टाळायचं असेल तर आपण सोशल मीडीयात या 6 चूका करत नाही ना, हे तपासा. करत असाल तर तातडीनं आपलं वागणं बदला.

1) दारु पितानाचे फोटो

आपण पाटर्य़ाबिटर्य़ा करतो, ते ठिक असेलही पण त्याचं सतत प्रदर्शन ऑनलाइन करु नका. तुम्ही दारुडे, ड्रग अ‍ॅडिक्ट आहात असा समज होऊ शकतो. त्यामुळे असे फोटो टाळा, मित्रांना तुम्हाला टॅग केलं असेल तर ते टॅग काढा.


2) लैंगिक टिका टिप्पणी

लैंगिक टिका टिप्पणी, भेदाभेद करणार्‍या पोस्ट टाकू नका. शेअर करु नका. फॉरवर्ड करु नका. 

3) व्याकरणाच्या चूका

तुम्ही कुठल्याही भाषेत लिहा, शुद्ध लिहा. व्याकरण सांभाळा. ज्यांना साधं ग्रामर येत नाही त्यांना लोक काय म्हणून नोकरी देतील?

4) गुंडागर्दी

सोशल मीडीयात इतरांना धमकावणं, वाद घालणं, ट्रोल करणं बंद करा.

5) अती अ‍ॅग्रेसिव्ह

आक्रमक पणे चर्चा करण्यात गैर नाही, पण आपण वाद घालतोय, लोकांचे अपमान करतोय, इतरांना जात धर्म, लिंग,रंग यावरुन शिव्या देतोय का हे पहा.


6)कंपनीला शिव्या

तुमचे भलेही आधीच्या कंपनी व्यवस्थापनाशी मतभेद असतील तरी त्यांना जाहीर शिव्या देऊ नका. बदनामी करू नका. तसं केल्यास दुसरी कंपनीही तुमच्यावर फुली मारते हे विसरु नये.

Web Title: six mistakes in social media could cost you the job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.