‘या’ सेलेब्सचे स्वप्न राहिले अपूर्ण; दुस-याच करिअरमध्ये मिळाले यश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 01:27 AM2017-10-23T01:27:19+5:302017-10-23T01:27:32+5:30
अनेक लोक लहानपणीच ठरवतात की, त्यांना मोठे झाल्यावर काय करायचे आहे किंवा कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे. पण, जर नशिबात दुसरेच काहीतरी लिहिलेले असेल तर काय करणार?
-अबोली कुलकर्णी
अनेक लोक लहानपणीच ठरवतात की, त्यांना मोठे झाल्यावर काय करायचे आहे किंवा कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे. पण, जर नशिबात दुसरेच काहीतरी लिहिलेले असेल तर काय करणार? अनेक सेलिब्रिटींबाबत असेच काहीतरी घडले आहे. त्यात परिणिती चोप्रा, स्मृती इराणी, महेंद्रसिंह धोनी यांच्यासह असे अनेक सेलिब्रिटी आहेत. प्रत्येक क्षेत्रात अशी अनेक नावे आहेत, ज्यांना बालपणी वेगळेच काहीतरी व्हायचे होते, पण त्यांना दुसºयाच क्षेत्रात यश मिळाले आणि त्यांच्या जीवनाची दिशाच बदलली. पाहूयात असेच काही कलाकार...
>परिणिती चोप्रा
परिणिती चोप्रा २८ वर्षांची झाली आहे. आज ती आघाडीच्या अॅक्ट्रेसपैकी एक आहे. पण, तिने कधीही या क्षेत्रात येण्याचा विचारही केला नव्हता. चित्रपटक्षेत्राशी काहीही संबंध नसल्याने ती बँकिंग क्षेत्रात जाण्याच्या विचारात होती. २००९ मध्ये शिक्षण पूर्ण करून ती भारतात परतली. यशराज फिल्म्समध्ये तिने पब्लिक रिलेशन्स कन्सल्टंट म्हणून जॉईन केले. काही दिवसांनी तिच्याकडे चित्रपटाच्या आॅफर्स आल्या आणि तिने याच बॅनरबरोबर ३ चित्रपटांचे कॉन्ट्रॅक्ट साईन केले. २०११ मध्ये परिणितीचा पहिला चित्रपट ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ रिलीज झाला होता.
>अनुष्का शर्मा
अनुष्का शर्माला सुरुवातीपासून सुपर मॉडेल बनायचे होते. तिने करिअरची सुरुवातही मॉडेलिंगद्वारे केली. पण शाहरुख खानसारख्या सुपरस्टार बरोबर चित्रपट मिळाल्याने तिने अॅक्ट्रेस बनण्याचा निर्णय घेतला.
>विशाल करवाल
‘१९२० लंदन’ मधून बॉलिवूड डेब्यू करणारा अॅक्टर विशाल करवालला पायलट बनायचे होते. पण नशिबाने त्याला अॅक्टर बनवले. एका मुलाखतीत तो म्हणाला होता, ‘आजही तो फ्लाइंगला मिस करतो.’
>स्मृती इराणी
स्मृती इराणी लहानपणापासून मीडिया क्षेत्रात जाण्यास इच्छुक होत्या. पण त्यांनी पत्रकार बनावे हे त्यांच्या वडिलांना मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी ब्युटी प्रॉडक्टची मार्केटिंग केली. त्यावेळी कुणीतरी मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला. पण, त्यात यश मिळाले नाही. त्यांना एअर होस्टेसची नोकरीही नाकारली गेली. पैसे मिळवण्यासाठी त्यांनी रेस्तराँमध्येही काम केले. त्यानंतर अॅक्टिंगची संधी मिळाली आणि पुढे काय झाले ते सर्वांनाच माहिती आहे.
>महेंद्रसिंह धोनी
भारतीय टीमचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी राहिलेला आहे. क्रिकेटमध्ये मोठी ओळख निर्माण करणारा धोनी हा शालेय दिवसांत फुटबॉल खेळायचा आणि त्यातही तो गोलकीपर होता. क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी तो खरगपूरच्या एका क्लबतर्फे खेळलाही होता. पण त्याच्या नशिबात कदाचित क्रिकेटर बनणेच लिहिलेले होते.