7500 पदांसाठी बंपर भरती, उत्तीर्ण झाल्यास CBI, IB मध्ये मिळेल नोकरी, लवकर करा अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 02:31 PM2023-04-11T14:31:04+5:302023-04-11T14:31:46+5:30

SSC CGL 2023 Registration : इच्छुक आणि पात्र उमेदवार एसएससीच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर अर्ज करू शकतात.

ssc cgl 2023 recruitment for 7500 posts will get job in cbi ib and other ministries apply soon | 7500 पदांसाठी बंपर भरती, उत्तीर्ण झाल्यास CBI, IB मध्ये मिळेल नोकरी, लवकर करा अर्ज 

7500 पदांसाठी बंपर भरती, उत्तीर्ण झाल्यास CBI, IB मध्ये मिळेल नोकरी, लवकर करा अर्ज 

googlenewsNext

नवी दिल्ली : सरकारी नोकरीच्या तयारीत असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. जवळपास 7500 पदांसाठी भरती निघाली आहे. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सीबीआय, आयबी आणि इतर विविध मंत्रालयांमध्ये नोकऱ्या मिळतील. ही भरती स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे (SSC) एकत्रित पदवीधर स्तर परीक्षेसाठी म्हणजेच CGL 2023 साठी आयोजित केली गेली आहे. याबाबतची अधिसूचना यापूर्वीच जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार एसएससीच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर अर्ज करू शकतात.

एसएससी सीजीएल परीक्षा 2023 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 मे 2023 आहे. पदवी उत्तीर्ण उमेदवार बहुतेक पदांसाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे अर्ज करण्यास अजून बराच वेळ आहे. मात्र, उमेदवारांना शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करण्याचा सल्ला दिला जात आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे, ते 7 आणि 8 मे रोजी आपल्या फॉर्ममध्ये सुधारणा करू शकतील. यासाठी एक वेगळी लिंक सक्रिय केली जाईल.

एसएससी सीजीएल टियर वन सीबीटी परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षा 14 जुलै ते 27 जुलै 2023 या कालावधीत घेतली जाईल. टियर 1 मध्ये यशस्वी झालेले उमेदवार टियर 2 च्या परीक्षेत बसतील. त्यासाठी स्वतंत्र अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. दरम्यान, टियर 2 परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये शुल्क जमा करावे लागेल. दुसरीकडे, महिला उमेदवार, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि ईएसएम उमेदवारांना शुल्क भरावे लागणार नाही.

असा करा अर्ज...
- सर्वात आधी ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- या वेबसाइटच्या होम पेजवर दिलेल्या Apply टॅबवर क्लिक करा.
- त्यानंतर आवश्यक डिटेल्स भरून स्वतःचे रजिस्ट्रेशन करा.
- डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि अर्ज फी भरा.
- यानंतर सबमिट करा आणि प्रिंट आउट घ्या.

Web Title: ssc cgl 2023 recruitment for 7500 posts will get job in cbi ib and other ministries apply soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.