JOB Alert : खूशखबर! सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 'या' पदासाठी होणार मोठी भरती, जाणून घ्या, माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 03:27 PM2022-10-13T15:27:54+5:302022-10-13T15:32:12+5:30

SSC Recruitment 2022 : SSC (स्टाफ सिलेक्शन कमिशन) देशातील विविध विभागांसाठी एकूण 73,333 पदांची भरती करणार आहे.

SSC Recruitment 2022 ssc will recruit 73333 posts for different departments of the central government | JOB Alert : खूशखबर! सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 'या' पदासाठी होणार मोठी भरती, जाणून घ्या, माहिती

JOB Alert : खूशखबर! सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 'या' पदासाठी होणार मोठी भरती, जाणून घ्या, माहिती

googlenewsNext

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. कर्मचारी निवड आयोग म्हणजेच SSC 2022 च्या भरती कॅलेंडरमध्ये 73 हजारांहून अधिक पदांची भरती करण्यात येणार आहे. रिपोर्टनुसार, SSC (स्टाफ सिलेक्शन कमिशन) देशातील विविध विभागांसाठी एकूण 73,333 पदांची भरती करणार आहे. मात्र, पदांच्या संख्येतही काही बदल केले जाऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्या गृह मंत्रालयात सर्वाधिक जास्त भरती होणार आहे. गृह मंत्रालयातील विविध विभागांमध्ये एकूण 28,825 पदांची भरती केली जाणार आहे. याशिवाय, दिल्ली पोलिसांमध्ये 7550 जागा भरल्या जाणार आहेत.

SSC सह भरतीसाठी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांनी जे डिटेल्स शेअर केले आहेत त्यानुसार, सी आणि डी ग्रुपसाठी एकूण 73,333 पदांची भरती केली जाईल. एकूण पदांची संख्या गरजेनुसार वाढवता किंवा कमी करता येते. या सर्व भरती गृह मंत्रालय, दिल्ली पोलीस, कॉन्स्टेबल जीडी, कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल एग्जाम, मल्टी टास्किंग स्टाफ, सब इन्स्पेक्टर सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनध्ये केल्या जातील. एवढेच नाही तर स्टाफ सिलेक्शन कमिशनने अनेक विभागांच्या भरतीसाठी जाहिरातीही दिल्या आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्ली पोलिसांच्या मल्टी टास्किंग स्टाफ (सिव्हिलियन) 2022 च्या भरतीसाठी अर्ज 7 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहेत. याशिवाय, 5 नोव्हेंबरपासून एकत्रित उच्च माध्यमिक स्तर परीक्षा 2022 साठी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. तर त्याच वेळी, केंद्रीय पोलीस दलातील कॉन्स्टेबल जीडी, आसाम रायफल्सचे एसएसएफ आणि रायफलमन जीडी भरती 2022 साठी अर्ज 10 डिसेंबरपासून सुरू होतील.

कोणत्या पदांसाठी किती जागा?

कॉन्स्टेबल जीडी - 24,605
कंबाइंड ग्रॅज्युएट लेव्हल एग्जाम (CGLE) – 20,814
मल्टी टास्किंग स्टाफ 2022 (MTS) - 4,682
सब इन्स्पेक्टर सेंट्रल पोलीस ऑर्गेनाइजेशन- 4,300
कॉन्स्टेबल (एग्जीक्यूटिव्ह) दिल्ली पोलीस – 6,433
कंबाइंड हायर सेकेंडरी लेवल एग्जाम (CHSL)- 2,960
एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: SSC Recruitment 2022 ssc will recruit 73333 posts for different departments of the central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी