शाहरुख खानकडून या 6 गोष्टी गिफ्ट घ्या, बघा करिअर चमकतंय का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 05:37 PM2017-11-02T17:37:33+5:302017-11-02T17:37:33+5:30
शाहरुख खान यशस्वी आहेच पण त्यानं आपलं करिअर कसं बांधलं हे ही शिकण्यासारखं आहे.
शाहरुख खानचा आज वाढदिवस. काय त्याचं यश, त्याचा पैसा, पॉवर, त्याचं लोकप्रिय असणं. कशाचंही करावं तेवढं कौतूक कमीच. कधीकाळी दिल्लीहून आलेला हा छोरा मुंबईवर राज्य करेल असं कुणाला वाटलं होतं. पण ते त्यानं केलं, या शहरात स्वतर्चं स्थानच नाही तर एक अढळपद निर्माण केलं. त्याच्या करिअरची वाटचाल पाहता, त्याच्याकडून शिकावं असं काही आहे का, विशेषतर् आपल्या करिअरसाठी. आपण आपल्या कामाचा विचार करतो, तेव्हा त्याच्याकडून काही करिअर टिप्स घेता येइल का? त्याच्याकडून अनेक गोष्टी शिकू शकतोच, पण निदान या काही गोष्टी केल्या तर आपलं करिअरही टेकऑफ करू शकेल.
1) लव्ह युवर जॉब. हे पहिलं सूत्र. त्याचं त्याच्या कामावर जीवापाड प्रेम आहे. वाट्टेल तेवढी मेहनत तर तो करतोच, पण आपल्या कामात जान ओततो. आपलं आपल्या कामावर किती प्रेम आहे, विचारायला हवं स्वतर्ला!
2) आपण काय आहोत? आपण आपल्यालाच विचारावं. कुठं आपण तडजोड करणार हे पहावं. शाहरुखने ही तडजोडी केल्याच. पण तडजोडीची व्याख्या त्यानं त्याची केली. आणि जे केलं ते मनापासून केलं.
3) मोठी स्वप्न पहा ज्या शहरात त्याला भाडय़ानं घर घेणं मुश्किल होतं तिथं त्यानं आपली मन्नत पूर्ण केली. मोठी स्वपA पाहिलीच नाही तर ती पूर्ण केली. ती स्वप्न पाहताना लोक त्याला हसलेही. पण तो हरला नाही. मोठी स्वप्न पाहणं गुन्हा नाही हे त्यानं सिद्ध केलं.
4) पैसे कमावणं वाईट नाही. आपल्या मध्यमवर्गीय जगात आपल्याला फार पैसे कमावणं का रुचत नाही? कष्टानं, योग्य मार्गानं आपल्या कामाचा चोख मोबदला मिळणं हे काही वाईट नाही. तो आपण घेतलाच पाहिजे, सुखात जगणं पाप नव्हे. शाहरुखने पैसे कमावले, त्यासाठी लगAात नाचला. त्यानं कामात खोट केली नाही. पण पैशाची ताकदही कमी लेखली नाही.
5) वेगळी वाट शोधा. हिरो ऐवजी अॅण्टीहिरोचे सिनेमे त्यानं केले? ते का?
कारण त्याला वेगळं काही करुन पहायचं होतं. ते आव्हान त्यानं स्वीकारलं. यशस्वी केलं. चॉकलेट हिरोच्या मळक्या वाटेवरुन तो चालला नाही. म्हणून यशस्वीही झाला. त्यानं केली तशी हिंमत करायची आपली तयारी आहे का?
6) कुटुंबाचा हात सोडून नका. शाहरुख फॅमिली मॅनच आहे. त्याला त्याचं कुटुंब प्यारं आहे. यश मिळालं तरी घरच्यांशी, नातेवाईकांशी फटकून वागू नये हेच तो सांगतोय.