६ महिन्यात Air Indiaत ३,८०० जणांना नोकरी! हजारो पदासांठी पुन्हा भरती; इंजिनिअर्सना मोठी संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 11:07 AM2023-04-09T11:07:08+5:302023-04-09T11:09:37+5:30

टाटा समूहाने एअर इंडिया कंपनीच्या कार्यपद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केला असून, कर्मचाऱ्यांसाठी विविध २९ धोरणे लागू केली आहेत.

tata group air india recruitment 2023 job for thousands of various vacancy in air india bharti 2023 | ६ महिन्यात Air Indiaत ३,८०० जणांना नोकरी! हजारो पदासांठी पुन्हा भरती; इंजिनिअर्सना मोठी संधी

६ महिन्यात Air Indiaत ३,८०० जणांना नोकरी! हजारो पदासांठी पुन्हा भरती; इंजिनिअर्सना मोठी संधी

googlenewsNext

Air India Recruitment 2023:टाटा समूहाकडे एअर इंडियाची कमान पुन्हा आल्यापासून एकामागून एक मोठे निर्णय घेतले जात असल्याचे पाहायला मिळत आहेत. एअर इंडियाला जगातील सर्वोत्तम विमान कंपनी करण्यावर टाटा समूहाकडून भर दिला जात आहे. आतापर्यंतची सर्वांत मोठी ऑर्डर बुक केल्यानंतर आता एअर इंडियामध्ये हजारो पदांसाठी पुन्हा मोठी भरती केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या ६ महिन्यात सुमारे ३ हजार ८०० जणांना नोकरी दिल्यानंतर आता पुन्हा एअर इंडियाकडून विविध पदांसाठी मोठी भरती करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. यात इंजिनिअर्सना संधी असल्याचे म्हटले जात आहे. 

पायलट म्हणून काम करण्याची इच्छा असणाऱ्या आणि हवाई वाहतुकीशी संबंधित क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी असल्याचे बोलले जात आहे. टाटा उद्योगसमुहाकडून त्यांच्या एअर इंडिया कंपनीमध्ये हजारो जागांसाठीची लवकरच भरती जाहीर करण्यात येणार आहे. काही अहवालांनुसार, कंपनीला ६ हजार ५०० पेक्षा जास्त पायलट, अभियंते आणि क्रू मेंबर्सची गरज असून, लवकरच एअर इंडियामध्ये पुन्हा भरती सुरू होणार आहे. 

सहा महिन्यांमध्ये ३ हजार ८०० नवीन कर्मचाऱ्यांची भरती

टाटा उद्योगसमूहाने एअर इंडिया कंपनीच्या कार्यपद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केला आहे. एअर इंडियाने आपल्या पाच वर्षांच्या परिवर्तन योजनेअंतर्गत मागील सहा महिन्यांमध्ये ३ हजार ८०० नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली असून,  कर्मचाऱ्यांसाठी विविध २९ धोरणेही लागू केली असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. अशातच आता कंपनीकडून विविध पदासांठीची मोठी भरती जाहीर करण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत एअर इंडियामध्ये ९०० वैमानिक आणि ४,२०० कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. कंपनीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सेवेचा विस्तार करण्याची योजना आखली असून त्याचाच भाग म्हणून ही भरती केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, एअर इंडियाकडून माहिती तंत्रज्ञानासाठी २० कोटी अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्यात येत आहे. तर कंपनीने ४७० विमानांच्या खरेदीसाठी मागणी नोंदवली आहे. एअर इंडियाच्या परिवर्तनासाठी टाटा समूहाने ‘विहान डॉट एआय’ योजना लागू केली आहे. सुरुवातीच्या सहा महिन्यांमध्ये अनेक आघाड्यांवर प्रगती झाली असून वाढीसाठी मजबूत पाया तयार करण्याच्या दृष्टीने मोठा प्रवास पूर्ण करण्यात आला आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: tata group air india recruitment 2023 job for thousands of various vacancy in air india bharti 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.