फ्रेशर्सना सुवर्ण संधी! 'या' क्षेत्रातील टॉप कंपन्या देणार ९१ हजार नोकऱ्या

By देवेश फडके | Published: January 20, 2021 12:49 PM2021-01-20T12:49:38+5:302021-01-20T12:52:51+5:30

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजी, इन्फोसिस आणि विप्रो या देशातील टॉपच्या कंपन्या सुमारे ९१ हजार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

top four IT companies may give jobs to 91 thousand freshers for this financial year | फ्रेशर्सना सुवर्ण संधी! 'या' क्षेत्रातील टॉप कंपन्या देणार ९१ हजार नोकऱ्या

फ्रेशर्सना सुवर्ण संधी! 'या' क्षेत्रातील टॉप कंपन्या देणार ९१ हजार नोकऱ्या

googlenewsNext
ठळक मुद्देमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरीच्या मोठ्या संधीआगामी आर्थिक वर्षात ९१ हजार कॅम्पस भरती करणारटीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजी, इन्फोसिस आणि विप्रो टॉपच्या कंपन्यांची योजना

नवी दिल्ली : कोरोना संकाटामुळे अनेकांना बेरोजगार व्हावे लागले. मात्र, लॉकडाऊन निर्बंध शिथील केल्यानंतर आता मोठ्या प्रमाणात नोकरभरती सुरू केली जाणार आहे. आगामी वर्षात म्हणजेच २०२१-२२ या कालावधीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजी, इन्फोसिस आणि विप्रो या देशातील टॉपच्या कंपन्या सुमारे ९१ हजार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

देशातील आघाडीची आयटी कंपनी टाटा कन्सल्टंसी (टीसीएस) कंपनीचे ग्लोबर एचआर हेड मिलिंद लक्कड यांनी सांगितले की, 'टीसीएस'कडून आगामी आर्थिक वर्षात फ्रेशर्सची भरती केली जाणार आहे. कंपनी यंदाच्या वर्षात सुमारे ४० हजार कॅम्पस हायरिंग करणार आहे. गेल्या वर्षीही इतक्याच नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. 

इन्फोसिसकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी आर्थिक वर्षात २४ हजार नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाविद्यालयातून पदवीधारकांची 'कॅम्पस भरती' केली जाणार असून, आगामी वर्षभरात १५ हजार कॅम्पस हायरिंग करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीकडून आगामी आर्थिक वर्षात १५ हजार उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यावर्षी कंपनीने १२ हजार कॅम्पस हायरिंग केले होते. तर, विप्रोची आगामी आर्थिक वर्षात १२ हजार कॅम्पस हायरिंग करण्याची योजना आहे. 

कंपनी निश्चित लक्ष्यापेक्षा ३३ टक्के जास्त भरती करत आहेत. गेल्या वर्षी कंपनीने ७० टक्के भारतात आणि ३० टक्के परदेशातून भरती केली होती. मात्र, आता भारतातूनच मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहे, अशी माहिती एचसीएल टेक्नॉलॉजीचे प्रमुख एचआर अप्पाराव वीवी यांनी दिली. 

Web Title: top four IT companies may give jobs to 91 thousand freshers for this financial year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.