असिस्टंट कमांडंट व्हायचंय?; १६ मे पर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची अखेरची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 10:58 AM2023-05-03T10:58:19+5:302023-05-03T10:58:33+5:30

या पाचही केंद्रीय निमलष्करी सुरक्षा दलात असिस्टंट कमांडन्ट (उच्चश्रेणी गट-अ) हे पद अत्यंत महत्त्वाचे मानाचे, प्रतिष्ठेचे, महत्वाचे आहे.

Want to be an Assistant Commandant?; Last date to submit online application form is May 16 | असिस्टंट कमांडंट व्हायचंय?; १६ मे पर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची अखेरची मुदत

असिस्टंट कमांडंट व्हायचंय?; १६ मे पर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची अखेरची मुदत

googlenewsNext

सेन्ट्रल आर्मड पोलिस फोर्स, असिस्टन्ट कमान्डन्ट परीक्षा ६ ऑगस्ट रोजी होत आहे. भारतीय सशस्त्र दलांना निमलष्करी दलांकडून मदत मिळते. भारतात पाच केंद्रीय निमलष्करी सुरक्षा दल कार्यरत आहे. ही सर्व दल गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येतात. सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलिस दल, भारत- तिबेट सीमा पोलिस दल, सशस्त्र सीमा बल ही ५ केंद्रीय निमलष्करी सुरक्षा दल देशांतर्गत सुव्यवस्था निर्माण करणे, नागरी प्रशासनाची मदत करून स्थिरता निर्माण करणे, शांतता काळात सीमांचे रक्षण करणे, युद्धकाळात महत्त्वाचे रस्ते व पूल आणि महत्त्वाची ठिकाणे यांचे रक्षण करणे. यासारखी कर्तव्ये पार पाडतात.

या पाचही केंद्रीय निमलष्करी सुरक्षा दलात असिस्टंट कमांडन्ट (उच्चश्रेणी गट-अ) हे पद अत्यंत महत्त्वाचे मानाचे, प्रतिष्ठेचे, महत्वाचे आहे. असिस्टंट कमांडन्ट उच्चश्रेणी गट-अ या पदाच्या भरतीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगद्वारे दरवर्षी सेन्ट्रल आर्मड पोलिस फोर्स (असिस्टंट कमांडंट) ही परीक्षा घेण्यात येते.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ : www.upsc.gov.in 
ऑनलाइन अर्ज करण्याची  मुदत : १६ मे २०२३ 
लेखी परीक्षा : ६ ऑगस्ट २०२३ 
परीक्षा शुल्क : २०० रु. (अनुसूचित जाती/जमाती व महिलांना शुल्क नाही)
परीक्षा केंद्र : मुंबई, नागपूर
वयोमर्यादा : किमान २० वर्ष व कमाल २५ वर्ष (इतर मागासवर्ग कमाल २८ वर्ष, अनुसूचित जाती/जमाती कमाल ३० वर्ष)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
शारीरीक पात्रता : 
पुरुष : वजन किमान, ५० किलो,  उंची किमान, १६५ सेमी , छाती ८१ सेंमी.
महिला : वजन ४६ किलो, किमान उंची, १५७ सेंमी.
अ) पुरुष : १६ सेकंदात १०० मीटर धावणे.  ३ मिनिटे ४५ सेकंदात ८००  मीटर धावणे. उंच उडी ३.५ मीटर (३ प्रयत्न ). गोळा फेक (७.२६  किलो) ४.५ मीटर
ब)  महिला : १८ सेकंदात १०० मीटर धावणे. ४ मिनिट ४५ सेकंदात ८०० मीटर धावणे. उंच उडी ३ मीटर  (३ प्रयत्न).  यानंतर सर्वांची वैद्यकीय चाचणी घेण्यात येते.

मुलाखत / व्यक्तिमत्व चाचणी
यशस्वी उमेदवारांची १५० गुणांची मुलाखत घेण्यात येते. लेखी परीक्षा ( ४५० गुण) व  मुलाखत (१५०  गुण) यांची एकत्रित बेरीज करून मिळालेले गुण वर दिलेला प्राधान्यक्रम याप्रमाणे उमेदवारांची अंतिम निवड केली जाते.  - प्रा. राजेंद्र चिंचाेले, (स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शक)

Web Title: Want to be an Assistant Commandant?; Last date to submit online application form is May 16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.