नोकरीसाठी कोणत्या देशांत जाणार तुम्ही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 06:03 IST2024-05-07T06:02:48+5:302024-05-07T06:03:01+5:30
विदेशात नोकरीची संधी शोधणाऱ्या भारतीयांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याचे बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या (बीसीजी) अभ्यासातून पुढे आले आहे.

नोकरीसाठी कोणत्या देशांत जाणार तुम्ही?
नवी दिल्ली : उच्चशिक्षणानंतर अनेक जण विदेशात नोकरीचा निर्धार करीत असतता. आयटीमध्ये शिक्षण घेणारी मुले युरोप, अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर जात असतात. या क्षेत्रात अनेक भारतीय तरुण-तरुणींनी चांगले यश संपादन केले आहे. आजवर विदेशात नोकरीसाठी संयुक्त अरब अमिरात हे भारतीयांचे सर्वात आवडते ठिकाण होते. परंतु पसंतीक्रमात हा देश सहाव्या स्थानी घसरला आहे. विदेशात नोकरीची संधी शोधणाऱ्या भारतीयांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याचे बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या (बीसीजी) अभ्यासातून पुढे आले आहे.
भारतात बंगळुरू, दिल्ली नोकरीसाठी आघाडीवर
nयाउलट आता भारतही नोकरी शोधणाऱ्यांसाठी आकर्षक पर्याय म्हणून पुढे येताना दिसत आहे. याबाबतीत भारताचे रँकिंग मागच्या पाच वर्षांत ६ पॉइंट्सने सुधारले आहे.
nनोकरीसाठी बंगळुरू, दिल्ली ही शहरे सर्वात लोकप्रिय आहेत. ग्लोबल रँकिंगमध्ये या दोन शहरांचे स्थान
मात्र घसरले आहे.
n२०१८ पासून हा अहवाल जारी करण्यात येत आहे. तेव्हापासून पहिल्यांदाच या शहरांच्या यादीत अहमदाबादचा समावेश झाला आहे.
nभारतात नोकरी शोधणाऱ्यांमध्ये संयु्क्त अरब अमिरातमधील लोकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर नायजेरिया आणि केनिया या देशातील नागरिकांचा नंबर लागतो.
आता ओढा कुणीकडे?
नोकरीसाठी परदेशात जाणाऱ्या भारतीयांची पसंती सध्या ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी आणि इंग्लंड या देशांना आहे. रँकिंगमध्ये पहिल्या चार स्थांनी ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंड हे देश आहेत. जागतिक स्तरावरील शहरांचा विचार केला असता सर्वात जास्त पसंती लंडनला आहे, तर पहिल्या पाच शहरांमध्ये न्यूयॉर्कचा समावेश होतो.
७८%इतके प्रमाण २०२० मध्ये विदेशात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या युवकांचे प्रमाण होते. परंतु हे प्रमाण सातत्याने घटताना दिसत आहे.
५४%
इतके प्रमाण २०२३ मध्ये परदेशात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्याचे आहे, असे बीसीजीच्या ‘इंटरनॅशनल मोबिलिटी ट्रेंड्स’ हा अहवाल सांगतो.