महिलांना मोफत शिलाई मशीन मिळणार, केंद्र सरकारची योजना; ‘असा’ करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 04:08 PM2022-03-20T16:08:42+5:302022-03-20T16:09:12+5:30

केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन दर महिन्याला चांगली कमाई करता येते. मोफत शिलाई मशीन गरीब आणि कष्टकरी महिलांना आत्मनिर्भर बनवून रोजगाराची संधी उपलब्ध करून देते.

Women will get free sewing machines, central government scheme; know how to Apply | महिलांना मोफत शिलाई मशीन मिळणार, केंद्र सरकारची योजना; ‘असा’ करा अर्ज

महिलांना मोफत शिलाई मशीन मिळणार, केंद्र सरकारची योजना; ‘असा’ करा अर्ज

googlenewsNext

नवी दिल्ली – देशातील एक मोठी लोकसंख्या गरीब आणि कामगार महिलांची आहे. महिलांना स्वत:चं आयुष्य जगण्यासाठी अनेक संकटाचा सामना करावा लागतो. महिलांची ही समस्या सोडवण्यासाठी भारत सरकारने या महिलांना मोफत शिलाई मशीन देण्याची योजना सुरू केली. या योजनेतंर्गत देशातील प्रत्येक राज्यात ५० हजारांहून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात येते. सरकारच्या या योजनेचा फायदा घेऊन महिला स्वावलंबी बनू शकतात.

केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन दर महिन्याला चांगली कमाई करता येते. मोफत शिलाई मशीन गरीब आणि कष्टकरी महिलांना आत्मनिर्भर बनवून रोजगाराची संधी उपलब्ध करून देते. मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांना घेता येऊ शकतो. या मशीनमुळे महिला कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतात. जर तुम्हालाही सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वय २० ते ४० वयोगटातील असणं बंधनकारक आहे.

या योजनेचा फायदा गरीब आणि कष्टकरी महिलांना मोठ्या प्रमाणात होत आहे. घरबसल्या महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध झाल्याने महिन्याला चांगली कमाई करता येते. दुर्बळ घटकातील महिलांचे आर्थिक राहणीमान सुधारण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे. जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. अर्जासोबत आधार कार्ड, जन्मदाखला, आयकर प्रमाणपत्र, ओळखपत्र, दिव्यांग असेल तर त्याचे प्रमाणपत्र, शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो असणे गरजेचे आहे. ही योजना महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश राजस्थान, छत्तीसगढ, बिहार या राज्यांसाठी लागू आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर https://www.india.gov.in/  क्लिक करावं लागेल. त्यानंतर याठिकाणी अर्ज डाऊनलोड करावा लागेल. अर्जासोबत लागणारी कागदपत्रे लक्षपूर्वक जोडावे. सर्व कागदपत्रांसह अर्ज संबंधित कार्यालयात जाऊन जमा करावा. त्यानंतर अधिकारी या अर्जाची पडताळणी करतील. त्यानंतर पात्र महिलांना या योजनेतंर्गत मोफत शिलाई मशीन दिली जाईल. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १.२ लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे.

फ्री सिलाई मशीन योजना अर्ज येथे क्लिक करा

Web Title: Women will get free sewing machines, central government scheme; know how to Apply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.