JOB Alert : खूशखबर! रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती; असा करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 05:17 PM2021-09-10T17:17:12+5:302021-09-10T17:25:57+5:30

JOB Alert : रेल्वेमध्ये (Railway Recruitment 2021) काही पदांसाठी भरती केली जाणार (Recruitment) आहे.

JOB Alert rrb secr recruitment 2021 for 339 posts check details here | JOB Alert : खूशखबर! रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती; असा करा अर्ज

JOB Alert : खूशखबर! रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती; असा करा अर्ज

googlenewsNext

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. रेल्वेमध्ये (Railway Recruitment 2021) काही पदांसाठी भरती केली जाणार (Recruitment) आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये 339 अप्रेंटिस पदांची भरती केली जाणार आहे. या जागा 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आहेत. त्यामुळेच दहावी उत्तीर्ण असणाऱ्या तरुणांसाठी सरकारी नोकऱ्यांची ही एक उत्तम संधी आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2021 आहे. ही भरती रेल्वेच्या विविध विभागांसाठी आहे. 

पदांची नावं 

वेल्डर
सुतार
फिटर
इलेक्ट्रीशियन
स्टेनो
वायरमन
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
मेकॅनिक डिझेल

पात्रता

दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित ट्रेड/क्षेत्रातील ITI प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे.

वयोमर्यादा

उमेदवारांचे वय 15 वर्षे ते 24 वर्षे दरम्यान असावे.

निवडप्रक्रिया 

10 वी आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. निवडीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.

अर्ज कसा करावा?

इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज अधिकृत वेबसाईट apprenticeship.org वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

432 पदांसाठी अर्ज उद्यापासून सुरू

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, (SECR) अपरेंटिस पदासाठी अर्ज मागवले आहेत. अप्रेंटिसच्या एकूण 432 पदांची भरती केली जाईल. यासाठी, अर्ज करण्याची प्रक्रिया 11 सप्टेंबरपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2021 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट secr.indianrailways.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: JOB Alert rrb secr recruitment 2021 for 339 posts check details here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.