विलगीकरण कक्षासाठी ग्रामपंचायतींना १ कोटी ८८ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:35 AM2021-04-30T04:35:51+5:302021-04-30T04:35:51+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांकरिता गृह विलगीकरणाचा ...

1 crore 88 lakhs to Gram Panchayats for segregation cell | विलगीकरण कक्षासाठी ग्रामपंचायतींना १ कोटी ८८ लाख

विलगीकरण कक्षासाठी ग्रामपंचायतींना १ कोटी ८८ लाख

Next

चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांकरिता गृह विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध आहे, मात्र, ग्रामीण भागातील घरात पुरेशा जागे अभावी शक्य नाही किंवा गृह विलगीकरणाचे नियम पाळणे शक्य होत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरच शाळा, समाजभवन, अथवा ग्रामपंचायतीच्या सोयीनुसार विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी १ कोटी ८८ लाख ३० हजाराचे अनुदान जिल्हा खनिज निधीतून मंजूर केल्याची जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले.

गावात विलगीकरण कक्ष उभारणे व त्यात प्राथमिक सुविधा निर्माण करणे, गावातील नागरिकांची व बाहेरून आलेल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांना वैद्यकीय सेवा पुरविणे, गावात फवारणी करणे, आवश्यक साहित्य खरेदी करणे, यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला खनिज निधीतून अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी पाच हजारांवरील लोकसंख्या असलेल्या २२ ग्रामपंचायतीला प्रत्येकी ५० हजार, दोन हजार ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या १६३ ग्रामपंचायतीला प्रत्येकी ३० हजार तर दोन हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ६४३ ग्रामपंचायतीला २० हजार याप्रमाणे जिल्ह्यातील एकूण ८२७ ग्रामपंचायतींना अनुदान देण्यात येणार आहे. वरील निर्णयामुळे ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांना गावातच विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध झाल्याने दिलासा मिळाला आहे.

Web Title: 1 crore 88 lakhs to Gram Panchayats for segregation cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.