राजुरा नगर परिषदेचे १ लाख ४५ हजारांचे शिलकी अंदाजपत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:37 AM2021-02-27T04:37:45+5:302021-02-27T04:37:45+5:30
यामध्ये एकूण उत्पन्न ६५ कोटी २४ लाख २७ हजार १०० व खर्च ६५ कोटी २२ लाख ८१ हजार ...
यामध्ये एकूण उत्पन्न ६५ कोटी २४ लाख २७ हजार १०० व खर्च ६५ कोटी २२ लाख ८१ हजार ७०० असून १ लाख ४५ हजार ४०० चे शिल्लकी बजेट सादर करण्यात आले.
यात नगरपरिषद कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी १० कोटी, होमिओपॅथी दवाखान्यासाठी ७ लाख, ग्रंथालय पुस्तकासाठी १० लाख, प्रधानमंत्री आवास योजना ३ कोटी, कापनगाव नाला बंधारा बांधकाम ५० लाख, रामनगर काॅलनी वाचनालय बांधकाम, इंदिरा शाळेमागील जागेवर बगीचा व खुले रंगमंचाचे बांधकाम, इंदिरानगर येथे स्मशान, कब्रस्थान बांधकाम, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थानांतरन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची जागा वाढवून सौंदर्यीकरण, राज्य सरोवर तलाव सौंदर्यीकरण १ कोटी रुपयांची विकासकामे व अन्य महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी विशेष कार्यप्रणालीद्वारे यंत्रणा राबवून उद्दिष्ट पार पाडण्याचा मनोदय नगराध्यक्षांनी व्यक्त केला आहे.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष स्व. मंगला आत्राम यांच्या फोटोचे सभागृहात अनावरण करण्यात आले व स्व. प्रा. अनिल ठाकूरवार यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली.
सदर अंदाजपत्रक तयार करण्यासाठी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, लेखापाल अश्विन भोई यांनी सहकार्य केले. अंदाजपत्रकीय सभेला उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सभापती हरजितसिंग संधू, आनंद दासरी, वज्रमाला बतकमवार, राधेश्याम अडानिया, विरोधी पक्षनेते रमेश नळे, विजय जांभूळकर, रवी जामूनकर व सर्व सन्माननीय सदस्य नगरसेवक, नगरसेविका व सर्व विभागप्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.